जी. एच. रायसोनी महाविद्यालयात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनियर्सच्या वतीने “रिजनल कॉन्क्लेव”

“सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक”वर आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन ; विविध महाविद्यालयातील विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग जळगाव, ता. १५ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनियर्स इनकॉरपोरेटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १५ रोजी “सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक” या शीर्षकाखाली थर्ड रिजनल कॉन्क्लेव ऑफ स्टुडट चाप्टर (वेस्टर्न रिजन) चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील फिजिकल सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्रा.अशोक एम.महाजन, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, आय.ई.आय चे राज्य सचिव इंजी. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील तसेच उपाध्यक्ष श्री. महेश संघवी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी थर्ड रिजनल कॉन्क्लेवच्या प्रास्ताविकेत अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सांगितले कि, रायसोनी इस्टीट्युट सदैव द...