व्यवसायाची घडी नीट बसवायची असेल तर तंत्रज्ञानाचे बदल स्वीकारा: प्रा. समिश दलाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालय व जितोतर्फे अप्लायिंग टेक्नोलॉजी इन फॅमिली मॅनेज बिजनेस या विषयावर छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात प्रा. समिश दलाल यांचे व्याख्यान

जळगाव, ता. १२ : अर्थव्यवस्थेत सध्या महत्वाची बाब म्हणजे बदलते तंत्रज्ञान होय. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जेवढा कराल तेवढा फायदाच होणार हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे त्यामुळे तंत्रज्ञानाला न घाबरता सकारात्मकतेने व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करायला उद्योजकांनी शिकले पाहिजे, मागील काळात जी मोठमोठी कंपनी होती ही आधुनिक काळात न वळवल्याने समाप्त झालेली आहे. ज्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, त्यांचा व्यवसाय टिकून राहिलेला आहे. म्हणून व्यवसायात प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज आहे. असे प्रतिपादन एस. पी. जैन, मुंबई येथील व्यवस्थापनशास्त्राचे प्राध्यापक व सुपरिचित प्रा. समिश दलाल यांनी शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात उद्योजक,प्राध्यापक,अधिकारी,नागरिक व विध्यार्थी श्रोत्यांना त्यांच्या उत्साही भाषणाने मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन यांच्या सयुंक्त विध्यमाने संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेडचे संचालक अथांग जैन, विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती, उद्योजक अनिल कांकरिया, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जितो संघटनेचे प्रवीण पगारिया, रायसोनी इस्टीट्युटचे विश्वस्त महेंद्र रायसोनी व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. 

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत सांगितले की आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच नवतंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या प्रवाहासोबत जुडवून घ्यावे तसेच प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असे म्हणत प्राध्यापक समिश दलाल यांचे व्याख्यान उपस्थितांसाठी नक्की उपयुक्त ठरेल हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यानंतर उद्योजक अनिल कांकरिया यांनी मार्गदर्शन करताना म्हटले कि, उद्योग सुरू करणे सोपे असते, पण तो सातत्याने फायद्यात ठेवणे हे अधिक आव्हानात्मक असते. व्यवसायात यश आणि विस्तारासाठी नवीन तंत्रज्ञान फार महत्त्वाचे ठरते. पूर्वी आमचीही दुकाने पारंपरिक पद्धतीने चालत, परंतु मी आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाचा, ग्राहकांच्या नव्या अपेक्षांचा आणि तंत्रज्ञानातील बदलाचा कानोसा घेतला व स्वतःला व व्यवसायाला त्यानुसार आमूलाग्र बदलले. साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये केले, ग्राहकांना स्वतः वस्तू हाताळण्याचा व निवडण्याची मोकळीक मिळाली, त्यांचे बिलिंग संगणक व स्कॅनरच्या माध्यमातून वेगवान होऊ लागले. उत्पादने मानवी हाताचा स्पर्श न होता ग्राहकांच्या हातात शुद्ध, सुरक्षित पडावीत, यासाठी मी अत्याधुनिक यंत्रसामग्री व पॅकेजिंग यंत्रणा बसवली. व आता आमची पुढची पिढी म्हणजेच मुलगा व सून आमच्या फॅमिली बिजनेसमध्ये आल्याने व त्यांना तंत्रज्ञानाची असलेली चाणाक्ष जाणीवेमुळे आमच्या व्यवसायाची भरभराट होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी आयुष्याची जडणघडण होताना कुटुंबासह विविध संस्था, व्यक्ती, समाज यांचे साहाय्य महत्वपूर्ण असते. सामाजिक जाणीव ठेवून समाजाला परत देण्याची वृत्ती अंगीकारावी. फॅमिली बिजनेस मध्ये काम करताना थोरामोठ्यांनी दिलेले संस्कार, शिकवण प्रत्यक्ष कामात उतरवावी व निरंतर काम करावे असे मत श्री. अमळकर यांनी व्यक्त केले. यानंतर जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी तुम्ही कोणतेही काम करा, तुम्ही त्यात अव्वल यश मिळवणारे असले पाहिजे आणि तुमचा हा दृष्टिकोन नेहमीच असायला हवा. मी माझ्याच आजोबांचे उदाहरण देईन. त्याच्याकडे एक दृष्टी होती, धैर्य आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता होती. तुम्ही जैन इरिगेशनला भेट दिली असेल आणि तेथील काम पाहिले असेल. भवरलालजींनी नेहमी गुणवत्तेवर अधिक भर दिला आणि सर्व उत्पादने उत्तम दर्जाची असली पाहिजेत, त्यामुळे मी माझ्या आजोबाचा व वडिलांचा आदर्श समोर ठेवत कार्यरत असल्याचे अथांग जैन यांनी सांगितले. यानंतर विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती यांनी सांगितले कि आजचा काळ प्रत्येकानेच नवे शिकण्याचा आहे. सध्या ई-कॉमर्स, ऑनलाईन पेमेंट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल मीडिया मार्केटिंग असे नवे तंत्रज्ञान उद्योगांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. आपण त्यांचा अचूक लाभ उठवला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्योग स्वतःच्या पायावर स्थिरावल्यावर उद्योजकाने आपल्या लगेचच उत्पादनांचे व व्यवसायाचे ब्रँडिंग व प्रसिद्धी केली पाहिजे कारण नवी पिढी खरेदी करताना ब्रँडचा बारकाईने विचार करते. अबोल किंवा प्रसिद्धीविन्मुख राहून कधीही धंदा होत नसतो. बोलणाऱ्याची मातीही खपते, पण न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत, ही म्हण कायम लक्षात ठेवली पाहिजे. असे मत श्री. संचेती यांनी व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते प्रा. समिश दलाल यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात पुढे म्हटले कि, काळ ज्याप्रमाणे बदलतो त्याप्रमाणे उद्योजकाला बदलावं लागते. तो जर बदलला नाही तर त्याचा उद्योग काळाच्या ओघात नष्ट होतो. उदाहरणार्थ पूर्वी समाजजीवन निवांत होतं. व्यापार क्षेत्रातील कामं घड्याळाच्या काट्यावर नाही तर ऋतुचक्राप्रमाणे चालायची पण काळ बदलला तंत्रज्ञानाने जग जवळ आले आणि इंटरनेटच्या सहाय्याने परदेशातही व्यवसाय करता येऊ लागला. तसेच सबसे बडा रोग, क्या कहेगे लोग म्हणजेच कि आपण घेतलेल्या निर्णयावर किंवा एखाद्या कृतीवर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या मनात जे आहे तेच करा तसेच स्वतःवर असणारा विश्वास कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करत नसतो, पण स्वतःवरच्या विश्वासा मुळेच कधीतरी जीवनात चमत्कार घडतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. भारतातही आजमितीस असे काही उद्योग आहेत, जे खूप मोठे धोके पत्करत नाहीत; पण अत्यंत नियोजनपूर्वक आणि अचूक वेळेस निर्णय घेऊन शतकाहून अधिक काळ टिकून आहेत. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येत तो लवचिकता आणि कॅल्क्युलेटेड रिस्कचा. खरे पाहता सारासार विचार, मानसिक कौटुंबिक आधार, तसेच प्रसंगानुरूप लवचिकता आणि नियोजनपूर्वक काम करून निर्णय घेतले तर हमखास यश मिळतेच असे म्हणत व्यवसायात झूम, चॅटजीपिटीचा वापर यावर देखील त्यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशनचे प्रवीण पगारिया व जैन युवा फाऊंडेशनचे हरक सोनी यांनी सहकार्य केले. तर प्रा. अंजली बियाणी व प्रा. ज्योती जाखेटे यांनी सूत्रसंचालन केले तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश