जी. एच. रायसोनी महाविद्यालयात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनियर्सच्या वतीने “रिजनल कॉन्क्लेव”

“सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक”वर आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन ; विविध महाविद्यालयातील विध्यार्थी व प्राध्यापकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १५ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनियर्स इनकॉरपोरेटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १५ रोजी “सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक” या शीर्षकाखाली थर्ड रिजनल कॉन्क्लेव ऑफ स्टुडट चाप्टर (वेस्टर्न रिजन) चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवीयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील फिजिकल सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्रा.अशोक एम.महाजन, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, आय.ई.आय चे राज्य सचिव इंजी. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील तसेच उपाध्यक्ष श्री. महेश संघवी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी थर्ड रिजनल कॉन्क्लेवच्या प्रास्ताविकेत अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सांगितले कि, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, “सायबर सिक्युरिटी व डिजिटल फॉरेन्सिक” या कार्यक्रमाचा संशोधक, प्राध्यापक व विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व मार्गदर्शकाचे सकारात्मक अनुभव त्याचा प्रॅक्टीकल अभ्यास याने विध्यार्थ्यांना एक नवी वाटचाल मिळेल तसेच आज आपलं जगणं हे डिजिटल होत चाललं आहे. हे केवळ आपण वापरत असलेल्या गॅजेट्समुळेच नाही तर रोजच्या व्यवहारातील असंख्य गोष्टीच्या कारणाने व एकमेकांशी इंटरनेट अथवा संगणकीय जाळ्याच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. प्रचंड मोठय़ा प्रमाणात माहितीचे आदानप्रदान होत आहे, त्याचबरोबर प्रचंड असे माहितीसाठे तयार होत आहेत आणि कोणालाही हे सारे टाळून पुढे जाणे शक्य होणार नाही. अर्थातच या सर्व माहितीजाळ्याची, माहितीसाठय़ाची सुरक्षा हा कळीचा घटक ठरतो. कारण असे माहितीसाठे व माहितीजाळे हे मौल्यवान असतात. डिजिटल जगात याला संपत्तीचे मोल आहे. त्यामुळे डिजिटल जगात चोरीची संकल्पनादेखील बदलली आहे. या माहिती जाळ्यावर, साठय़ावर होणारा हल्ला हा त्या त्या कंपनीचे, आस्थापनांचे आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो. हे सर्व होते सायबर विश्वात. कारण आज या सर्व बाबी अनेक घटकांशी जोडलेल्या असतात आणि अर्थातच त्यामध्ये करिअरच्या अगदी असंख्य म्हणाव्या इतक्या संधी दडलेल्या आहेत. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यानंतर कॉन्क्लेवमधील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असेलेले  प्रा.अशोक एम.महाजन यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, भारतात गेल्याकाही वर्षात डिजिटल क्रांतीचे वारे वाहू लागले आहे. हा बदल केवळ स्वस्त इंटरनेट आणि प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन एवढ्या पुरताच मर्यादित राहिलेला नाही. आर्थिक व्यवहारात देखील डिजिटल क्रांती घडली आहे या अनुषंगाने सध्या देशभरात सायबर गुन्ह्याची संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान करुन घेणारे अनेक लोक भेटतात. विद्यार्थ्यांनाही लुटण्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्व देशांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग करुन आपल्या सुख सुविधा पूर्ण केल्या जातात. परंतु, याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग काही व्यक्तींकडून होताना दिसून येतो यातूनच गुन्हे घडले जातात. त्यामुळे सायबर सिक्युरिटी हि काळाची गरज बनली आहे तसेच डिजिटल फॉरेन्सिक्समध्ये करिअरसाठी अनेक कौशल्य विकसित झाली आहेत. विविध तंत्रज्ञानाचे ज्ञान, डिजिटल स्टोअरेज उपकरणे, संगणक ऑपरेटिंग सिस्टम, डिजिटल फॉरेन्सिक संगणक विश्लेषण, संगणक प्रोग्रॅमिंग, मालवेअर प्रकार, डेटा संबंधित नैतिक समस्या, डेटा संबंधित कायदेशीर समस्या, नवतंत्रज्ञान गोष्टी शिकण्याची क्षमता आदी कौशल्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच त्यांनी यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंडस्ट्री ४.०, विकसित भारत २०४७, आत्मनिर्भर भारत या विविध विषयासंबंधीत मार्गदर्शन केले. 

यानंतर इंजी. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांनी म्हटले कि आजकालच्या तरुणांनी जॉब सिकर न होता जॉब क्रियेटर व्हायला हवं म्हणजेच कि आजच्या पिढीने नौकरीच्या मागे न धावता आन्ट्रप्रनर होण्यास पसंती द्यायला हवी आणि असे झाल्यास देशाची आर्थिक प्रगती १०० टक्के होईल तसेच चॅटजीपीटीवर मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, तुमच्या वर्कफ्लोला चालना देण्यासाठी कामावर चॅटजीपीटीचा उत्तम वापर होत असल्याने त्याचा अधिकाधिक अभ्यास करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते महेश संघवी यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात म्हटले कि, सायबरसुरक्षा म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा यांसारख्या इंटरनेट-कनेक्टेड सिस्टमचे सायबर धोक्यांपासून संरक्षण करते. संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यांचा समावेश होतो. आपण आज आधुनिक युगात आहोत, जिथे पूर्वीपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन उपकरण यांच्यात वाढ होत आहे. त्यामुळे सायबरसुरक्षेचे महत्व ही वाढले आहे. आपल्या जीवनात काही गोष्टी संवेदनशील असतात, त्या गोपनीय माहितीची सुरक्षा व्हावी म्हणून सायबरसुरक्षा असणे गरजेचे आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा कशी करावी? याबाबतीत काही टिप्स आहेत जश्या कि, तुमचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा, अँटी-व्हायरस सुरक्षा वापरा, चांगला सुरक्षित पासवर्ड ठेवा, कोणताही असुरक्षित किंवा सार्वजनिक ठिकाणाचा वायफाय वापरू नका, कोणत्याही अनोळखी मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका, कोणत्याही अपरिचित साईटवर आपली माहिती शेअर करू नका.तसेच यासह त्यांनी सायबर सुरक्षा मध्ये फिशिंग काय आहे व भारताचे सायबर कायदे या विषयावर देखील सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पेपर प्रेजेंटेशन, पोस्टर प्रेजेंटेशन व प्रोजेक्ट एक्झीबेशन या तीन विविध इव्हेंट मध्ये विविध महाविद्यालयातील ३५० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या सेमिनार हॉलमध्ये कॉन्क्लेवतील उपस्थित वक्त्यांनी आपल्या अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शनातून उपस्थितांना खिळवून ठेवले. जळगाव व परिसरातील संशोधक, उद्योजक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह मोठ्या संख्येने भरलेले होते. या थर्ड रिजनल कॉन्क्लेवचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवाणी यांनी तर आभार संगणक विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी मानले तसेच प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. पल्लवी सुरवाडे, प्रा. पूजा नवाल, प्रा. योगिता धांडे, प्रा. शरयू बोंडे, प्रा. प्रियांशी बोरसे, प्रा. निलेश इंगळे, प्रा. तुषार वाघ, प्रा. डॉ. चेतन चौधरी, प्रा. रश्मी झांबरे यांनी सहकार्य केले. सदर कॉन्क्लेवचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश