उद्या सकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “फॅमिली मॅनेज बिजनेस”वर व्याख्यान
प्रसिद्ध व्याख्याते प्रा. समिश दलाल हे करणार मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
जळगाव, ता. ११ : येथील जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉक व जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन (जीतो) मार्फत उद्या ता. १२ मंगळवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंत प्रा. समिश दलाल हे उपस्थितांशी “अप्लायिंग टेक्नोलॉजी इन फॅमिली मॅनेज बिजनेस”या विषयावर संवाद साधणार असून, शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, जळगावमध्ये सकाळी ठीक १० वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होईल.
प्रा. समिश दलाल हे मुंबईच्या एस. पी. जैन या महाविध्यालयात व्यवस्थापनाचे सहयोगी प्राध्यापक असून त्यांची लेखक, संघटक आणि कॉर्पोरेट ट्रेनर अशीहि ओळख आहे तसेच त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅड विध्यापिठातून एमबीए केले असून हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि व्हार्टन बिजनेस स्कूल मध्ये देखील विविध कार्य क्षेत्रातच गाढा अभ्यास आहे. तसेच कौटुंबिक व्यवसायाच्या बाबतीत त्यांचा दीर्घ वर्षांचा अनुभव असून त्यांनी कौटुंबिक व्यवसायाच्या विषयावर दोन लाखाहून अधिक विध्यार्थ्यांना शिकवले आहे व पन्नास हजाराहून अधिक भारतीय कौटुंबिक व्यवसायांशी संबधित प्रकरणाचा अभ्यास केला आहे.तसेच ते या व्याख्यानात आजच्या तरुण पिढीला नवटेक्नोलॉजीचे सर्वभूत ज्ञान असल्याने या तरुणाईने आग्रहाने आपल्या फॅमिली बिजनेसमध्ये अग्रेसर होऊन कार्यरत व्हायला हवे, म्हणजेच फॅमिली बिजनेसमधील पहिल्या पिढीचा अनुभव, त्यांची हुशारी व दुसऱ्या पिढीला असलेली टेक्नोलॉजीची ओळख त्यांना मिळालेले उच्च शिक्षण व स्वातंत्र्य या दोघाच्या समन्वयाने फॅमिली बिजनेसची प्रगती हमखास शक्य असण्यावर ते या व्याख्यानात भर देणार आहे.
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांतर्गत हे व्याख्यान होणार असून, प्रा. समिश दलाल हे त्यांच्या भटकंतीतील विविध अनुभव व “अप्लायिंग टेक्नोलॉजी इन फॅमिली मॅनेज बिजनेस”चे विविध मुद्दे ते आपल्या व्याख्यानातून मांडणार आहेत. या व्याख्यानाचा सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधिकारी,साहित्यिक,नागरिक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशनचे प्रवीण पगारिया व जैन युवा फाऊंडेशनचे हरक सोनी यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment