जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी जल्लोषात साजरी

जळगाव,ता.६ : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभागी होत भक्तिमय वातावरणात दिंडी काढून अतिशय जल्लोषात साजरी केली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांच्याहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी यासह विविध पारंपरिक पद्धतीने वेशभूषा साकारली होती. तसेच विठ्ठल व रुख्मीनीच्या वेशभूषेत विद्यार्थी आले होते. यावेळी शाळेच्या शिक्षिका लीना त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांचे लेझिम पथक तसेच विठू माऊलीच्या चिमुकल्या वारकरी मुलांनी "विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला" या गाण्यावर पाऊली खेळत आनंद घेतला. यावेळी भारुड स्वरूपात विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. संपूर्ण परिसरात अगदी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.तसेच कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश