उत्तर महाराष्ट्रात प्रथमच रायसोनी महाविध्यालयाने “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” उपक्रम आयोजित केल्याचा अभिमान : खा. स्मिता वाघ

खासदार व प्र-कुलगुरूंच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी सलग २८ तास स्पर्धेचे आयोजन तसेच दोन लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके

जळगाव, ता. ८ : “जी-एचआर हॅक १.०” स्पर्धेद्वारे देशातील विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती तसेच नाविन्यपूर्ण संशोधन जगासमोर आणण्याचे जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे प्रयत्न कौतुकास्पद असून विध्यार्थ्यानी या अनोख्या संधीचा पुरेपूर फायदा घेवून संधीचे सोनं करावे, असे मत जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांनी मांडले.


ते जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यतेने संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागाद्वारे आयोजित “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ, पुणे सी-डॅक येथील शास्त्रज्ञ डॉ. मनीषा मंत्री, डॉ. शेखर रायसोनी, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत तसेच स्पर्धेचे प्रमुख समन्वयक संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व प्रा. डॉ. निलेश इंगळे उपस्थित होते.

या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, उत्तर महाराष्ट्रात प्रथमच विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” हे व्यासपीठ उपलब्ध करून हा देशव्यापी उपक्रम आयोजित केल्याचा सार्थ अभिमान असून स्पर्धेत सहभागी झालेले विध्यार्थी सलग २८ तास “प्रॉब्लम सॉल्विंग अप्रोच” ठेवत कृषी, शिक्षा, पर्यटन, वाणिज्य, उदयोग, संरक्षण, वित्त, आरोग्य, गृह या विविध विषयांवरील समस्यांचं निराकरण करत शिक्षण आणि संशोधनाचा आधार घेत देशाच्या विकासाचा पाया रचत आहेत. तसेच या स्पर्धेत देशभरातील आयआयटी, एनआयटी, ऑटोनॉमस महाविध्यालये या विविध नामांकित शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या असून त्यामुळे नक्कीच संपूर्ण देशभरात रिसर्च कल्चर निर्माण होण्यास मदत होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले कि, “जी-एचआर हॅक १.०” हा जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचा उपक्रम असंख्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि राष्ट्राच्या नवोन्मेष व्यवस्थेत योगदान देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल व उत्तर महाराष्ट्रातील नामांकित जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निव्वळ स्पर्धा नसून शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रे आणि सरकारला एकत्र आणून सहयोगातून शिकण्यास प्रवृत्त करणारी चळवळ ठरत असल्याचे म्हणत त्यांनी यावेळी महाविध्यालयातील सुविधांचे व स्पर्धेच्या अचूक नियोजनाचे कौतुक केले.

या स्पर्धेत चेन्नई, रायपूर,  बेंगळुरू,  मुंबई, दिल्ली, जयपूर, भोपाल, नागपूर या विविध शहरातील ४० संघांचे विद्यार्थी सहभागी झाले असून दोन दिवस स्पर्धेतून विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण करत आहेत. तसेच जे समाजोपयोगी सोल्युशन सर्वोत्तम आणि कार्यक्षम असेल, त्यांना अनुक्रमे दोन लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योती जाखेटे यांनी केले तर प्रा. डॉ. सोनल पाटील आभार यांनी मानले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश