शनिवारपासून जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन”

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच ८ राज्यातून ४० संघ होणार सहभागी ; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी सलग २८ तास स्पर्धेचे आयोजन तसेच दोन लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके

 

जळगाव, ता. ६ : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा प्रथमच उत्तर महाराष्ट्रातील नामांकित स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे ता. ८ व ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई)मान्यतेने संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून “जी-एचआर हॅक १.०” या शिर्षकाखाली हि स्पर्धा जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या आवारात होणार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, पुणे सी-डॅक येथील शास्त्रज्ञ डॉ. मनीषा मंत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित सिंग व डॉ. शेखर रायसोनी हे उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. यावेळी दोन लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत.

“प्रॉब्लम सॉल्विंग अप्रोच” ठेवत कृषी, शिक्षा, पर्यटन, वाणिज्य, उदयोग, संरक्षण, वित्त, आरोग्य, गृह या विविध विषयांवरील समस्यांचं निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा देशव्यापी उपक्रम आहे, शिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. याच अनुशंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमधून समाजोपयोगी संशोधनाला चालना मिळावी, उद्योजकांना पूरक असणाऱ्या संशोधनाची निर्मिती व्हावी. समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आवश्यक संशोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाहेर यावे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात असून उत्तर महाराष्ट्रासह प्रामुख्याने भारतातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली. यावेळी स्पर्धेच्या पोस्टर अनावरण प्रसंगी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यासहीत स्पर्धेचे प्रमुख समन्वयक संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व प्रा. डॉ. निलेश इंगळे उपस्थित होते.

 

कल्पनाशक्तीला वाव

एनआयटी व आयआयटी सहीत देशभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४५० विध्यार्थ्यामधून १७० विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असून सलग २८ तास हि स्पर्धा महाविध्यालयाच्या आवारात सुरु असणार आहे. तसेच महाराष्ट्रात हॅकेथॉन सारख्या स्पर्धेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. यातून अनेक उद्योजक घडू शकतात. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध केले जाणार असून या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी संशोधक, नवउद्योजक, स्कॉलर विध्यार्थी व शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,  असे आवाहन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

स्पर्धेचं थोडक्यात स्वरूप

या स्पर्धेत पहिल्या फेरीत समाज, संस्था आणि सरकारच्या गंभीर समस्या प्रदर्शित करून विध्यार्थ्यांना त्यावर उपाय शोधायला सांगतील व त्यावर भारतातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थी क्रियेटीव्ह, टिकाऊ व सामाजिक सलोख्याच्या आयडिया शोधून स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करतील तसेच ही स्पर्धा २८ तासांची कोडींग अँन्ड डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर स्पर्धा असून तीन स्तरांवर इवोल्युशन होईल. या स्पर्धेसाठी देशभरातून विकासक आणि प्रोग्रॅमर असेलेले परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेत वेळेची मर्यादा असल्यामुळे विद्यार्थी संघ रात्रंदिवस काम करतील, यामुळे हॅकेथॉन सहभागींना एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि विविध प्रकारच्या नवकल्पनांबद्दल विचार करण्यास भाग पडते. तसेच आयडियाची नवीनता, जटिलता, स्पष्टता विहित नमुन्यातील तपशील, टिकाऊपणा, प्रभावाचे प्रमाण, वापरकर्ता अनुभव आणि भविष्यातील कामाच्या प्रगतीची क्षमता यात तपासले जाते व यानंतर एका प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये सुमारे ४ ते ५ संघांची अंतिम फेरीत स्पर्धा करण्यासाठी निवड केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश