जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांचे रंगले “ग्रॅज्युएशन सेरेमनी”
दीक्षांत समारंभ प्रमाणपत्र देवून गौरव ; मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांचा जल्लोष
जळगाव, ता. १३ : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल
व प्री-प्रायमरीच्या लहान विध्यार्थ्यासाठी पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला
होता. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून पदव्या स्वरूपात
प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण
करून प्राथमिक वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता
ग्रॅज्युएशन सेरेमनी आयोजित करण्यात आली होती.
जी.
एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यासह विविध
मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये २०२४-२५ चा हा पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित
होते. या पदवीदान समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती देवीचे पूजन करून
करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी
केले. यावेळी त्यांनी नमूद केले कि, कार्यक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता प्रोत्साहित करणे हा होता तसेच जी. एच.
रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी सर्व शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन समिती सातत्याने प्रयत्नशील असतात.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, मुले
सुसंस्कारित व्हावीत, त्यांना आसपासच्या वातावरणातील
त्याचबरोबर समाजातील विविध रंग, आकार, चव, स्पर्श तसेच अन्य गोष्टींची ओळख व समज
व्हावी यासाठी येथील शिक्षाकांकडून विशेष प्रयत्न केले जातात अशी माहिती देत,
विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम वेळोवेळी घेऊन विद्यार्थ्यांना सजग
बनवून त्यांना त्याचा पुढच्या आयुष्यासाठी या संस्थेत घडविले जाते याचा आपणास आनंद
होत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी सी.के.जीच्या ६० विद्यार्थ्यांना
मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारल्यानंतर चिमुकल्यांनी
आपल्या बोलीभाषेत स्वतःचे मनोगत व्यक्त केले. त्यातूनच त्यांच्या शैक्षणिक
प्रगतीची माहिती झाली. पालकांनी देखील स्कूलमधील विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि
शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल रायसोनी
इस्टीट्युटच्या संचालिका सौ. पलकजी रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहा शिंपी,
वैशाली काळे, स्मिता भामरे व वरोनीका मॉरीस यासहित
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment