रायसोनी महाविध्यालय आयोजित जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत ‘आयआयटी चेन्नई’चा संघ विजेता
रायसोनी महाविध्यालयाला उपविजेतेपद ; विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच सलग २८ तास स्पर्धेचे आयोजन, देशभरातून ४० संघ सहभागी
यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाला संबोधित करतांना संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, नवीन तंत्रज्ञान संशोधक, नवउद्योग
आणि स्टार्टअप्स यांच्यासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जी. एच.
रायसोनी महाविद्यालयाच्या वतीने “जीएचआर- स्मार्ट इंडिया हॅकेथॉन” हे व्यासपीठ
उपलब्ध करून हा देशव्यापी उपक्रम आयोजित केल्याचा सार्थ अभिमान असून कृत्रिम
बुद्धिमत्तेचा शासनात वापर, आपत्ती
व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, प्रतिबंधित
क्षेत्रात ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर या विविध विषयांवरील समस्यांचं निराकरण
करत शिक्षण आणि संशोधनाचा आधार घेत सलग २८ तास विविध राज्यातून सहभागी झालेल्या
विध्यार्थ्यानी “प्रॉब्लम सॉल्विंग अप्रोच” ठेवत हि स्पर्धा यशस्वी केली.
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीच्या नमन गोयल व हर्ष पटेल यांनी “हेल्थकेअर एप्लीकेशन” हा प्रकल्प सादर केला. त्यांनी शिक्षण आणि संशोधनाचा आधार
घेत १२ कुल हॅकेथॉन आयडिया फॉर हेल्थकेअर, इन हॉस्पिटल सिस्टीम चेंज, हेल्थकेअर
प्रोव्हायडर रीलेक्शन अँप या विविध मुध्यांवर आपला प्रकल्प सादर केला. परीक्षकांसह
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनीही या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.
या स्पर्धेसाठी देशभरातून विकासक आणि प्रोग्रॅमर असेलेले पुणे येथील अलेपो टेक्नॉलॉजीच्या रुही शर्मा, क़्युए ऍमेझॉनचे प्राचार्य रोहित त्रिवेदी व सॅनट्रोनिक्स प्रा. ली. या आयटी कंपनीचे संचालक उमेश सेठिया यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. तर समन्वयक म्हणून अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. डॉ. निलेश इंगळे व कार्तिक चौधरी, कल्पेश बोर्डे, मृणाल महाजन, विद्या बाविस्कर या विध्यार्थ्यानी सलग २८ तास या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच सदर उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी एज्युटेक, पर्यावरण, हेल्थकेअर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, ॲग्रिटेक अशा सहा संकल्पना होत्या, त्यातील प्रत्येकी पाच समस्या विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आल्यात. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्या सोडविण्यासाठी स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार केलेत. यावेळी भारतातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी क्रियेटीव्ह, टिकाऊ व सामाजिक सलोख्याच्या आयडिया शोधून स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न केला तसेच ही स्पर्धा सलग २८ तासांची कोडींग अँन्ड डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर स्पर्धा असल्याने तीन स्तरांवर इवोल्युशन झाले. या स्पर्धेत वेळेची मर्यादा असल्यामुळे विद्यार्थी संघानी रात्रंदिवस काम केले, यामुळे हॅकेथॉन सहभागींना एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यास आणि विविध प्रकारच्या नवकल्पनांबद्दल विचार करण्यास भाग पडले. तसेच आयडियाची नवीनता, जटिलता, स्पष्टता विहित नमुन्यातील तपशील, टिकाऊपणा, प्रभावाचे प्रमाण, वापरकर्ता अनुभव आणि भविष्यातील कामाच्या प्रगतीची क्षमता हे विविध मुद्दे परीक्षकांनी तपासले.
Comments
Post a Comment