सह्याद्रीच्या
कुशीतील ‘कोकणकडा, हरिश्चंद्र गड व भंडारदरा धरण’ येथे संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साहसिक व शैक्षणिक सहलीचे आयोजन
; विध्यार्थ्यांचा
उत्स्फूर्त सहभाग
जळगाव ता. ३ :
जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व
एमसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल महाराष्ट्रातील ३०००
फुटांपेक्षाही उंच अश्या “कोकणकडा” व अहमदनगर जिलह्यातल्या अकोले या तालुक्यातून
पुढे १२५ किमी नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या व समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर
असणाऱ्या प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणजेच “हरिश्चंद्र गड” तसेच “भंडारदरा धरण”
येथे नुकतीच जाऊन आली.

या सहलीमध्ये
एकुण १०२ विद्यार्थी – विद्यार्थिनी व ४ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. सुरवातीला
विध्यार्थ्याना ‘हरिश्चंद्र गड’ला पोहचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा
धरणाच्या जलाशयाच्या काठाने अकोले या गावी जावे लागले. साडेतीन हजार वर्षांहूनही
प्राचीन हा हरिश्चंद्रगड असून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक शिखर आहे.
म्हणूनच हा गड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. तसेच या हरिश्चंद्रगडाची
महत्त्वाची व सर्वात सुंदर असणारी एक बाजू म्हणजे ‘कोकणकडा’. ३०००पेक्षा जास्त
फुटांचा अखंड वक्राकार असा हा दगडी कडा ट्रेकर्सची पंढरी म्हणूनही ओळखली जातो. जी.
एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या
मार्गदर्शनाखाली हि साहसिक व शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी
विद्यार्थ्यांमध्ये आउटबाउंड एक्टिविटी घेत त्यांच्यात टीम कम्युनिकेशन, नेटवर्किंगची
भूमिका, प्रॉब्लम सॉल्विंग स्किल, जोखीम घेणे, जागेवरच निर्णय घेणे, रणनीती तयार करणे, क्षमता मॅपिंग, आव्हान हाताळणे, वेळेचे
व्यवस्थापन, शिस्तीचे महत्त्व, ऐकण्याच्या
कौशल्यांचे महत्त्व, कम्फर्ट झोन तोडणे, शारीरिक
मर्यादांवर मानसिक ताकद असणे यासारख्या विविध बाबी आत्मसात करत त्यांनी निसर्गाने
बहरलेल्या हिरव्यागार ‘कोकणकडा’च्या डोंगरावरील वृक्ष, फुलझाडे, वनस्पतींचे
निरीक्षण करत विविध प्रजाती जाणून घेत जैवविविधतेचा अभ्यास केला. त्यानंतर
विद्यार्थ्यांनी भंडारदरा येथील धरण आणि रंधा धबधबा आदी स्थळांना भेट देत
पर्यटनाचा आनंद घेतला. बीसीए व एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांनी या
सहलीचे नियोजन केले होते तर प्रा. शुभम अडावल, प्रा. विनित महाजन. प्रा. मानसी
तळेले, प्रा. प्रतीक्षा पाटील यांनी या सहलीत सहभाग नोंदवीत विध्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले. तसेच विध्यार्थ्यानी ही सहल यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांचे
रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

‘मनस्वी टेक
सोल्युशन'ला अभ्यासदौरा
या शैक्षणिक सहलीच्या
अखेरच्या दिवशी नाशिक शहरालगत असलेल्या ‘मनस्वी टेक सोल्युशन’ येथे अभ्यासदौऱ्याचे
आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी
ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान
शिकलेल्या कार्पोरेट पद्धती, तंत्रज्ञान अंमलबजावणी, सायबरसुरक्षा
डोमेनमधील कार्यप्रवाह आणि सायबर सुरक्षा साधने या सर्व बाबींची माहिती
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात
व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या अभ्यासदौऱ्यात मनस्वी
टेक सोल्युशनच्या व्यवस्थापिका नम्रता जोशी यांनी इंडस्ट्रीजमधील विविध बारकावे
सांगत मार्गदर्शन केले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या
कार्यक्रमाने झाली.
Comments
Post a Comment