सिए दर्शन जैन यांनी
जीएसटी, इन्कम टॅक्स, उत्पन्न, खर्च,
बचत, गुंतवणूक आणि कर्ज व्यवस्थापन यासह
वित्तविषयक विविध पैलूंवर केले मार्गदर्शन ; विध्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग
जळगाव, ता. १० : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड
मॅनेजमेंट महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन्स
इनोवेशन कौन्सिल अँड इंटरनॅशनल क्वालिटी एस्यूरेंस सेलच्या वतीने “बजेट इनसाईट : एनालायझिंग इम्पॅक्ट अँड
अपॉर्च्युनिटी” या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले. यात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट जळगावचे
अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन यांनी अर्थसंकल्पावरील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी सीए दर्शन
जैन यांच्या अर्थसंकल्पीय अभ्यासाचे कौतुक
करत त्यांनी अशी व्याख्याने
विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी आयोजित
करणे अत्यंत गरजेचे असून यामुळे विध्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय आर्थिक धोरणांची समज वाढेल व
आपसूकच विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान दिल्यानंतर ते
सक्षम होतील तसेच नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून जवळपास सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे दिसत
असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे सर्व घटकांचा समावेश करत, महाविद्यालयीन
विध्यार्थ्यामध्ये दर्जात्मक सुधारणा करण्याचा प्रयन्त हा अर्थसंकल्प नक्की करेल असे
मत संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी नोंदविले.

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सीए. दर्शन जैन यांनी
नमूद केले कि, आपल्या देशाची
लोकसंख्या ही 136 कोटींवर गेल्याचं आकडेवारी सांगतेय. पण एवढ्या मोठ्या
लोकसंख्येच्या देशामध्ये सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 8 कोटी 13 लाख
22 हजार 263 लोकांनी आयकर भरला आहे. तसेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केली आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीमध्ये आयकर तसेच कंपनी कराचाही समावेश आहे. तसेच
यामध्ये अशाही लोकांचा समावेश आहे ज्यांचा टीडीएस कट झाला आहे पण त्यांनी आयकर
भरला नाही किंवा रिटर्न फाईल केली नाही. तसेच आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही
संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ कर प्रणाली विकसीत करण्यात
आली आहे. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता
आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगत त्यांनी विकासाला चालना देण्यासाठी संशोधन,
‘विकसित भारता’साठी राज्यात घडवण्यात
आलेल्या सुधारणा, करदात्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मिळालेली सफलता, अर्थव्यवस्था – तेव्हाची
आणि आताची,केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण करतांना तरुणाईने
अर्थसंकल्प कसा समजावा, केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार ?, सामाजिक न्याय, ‘गरीब कल्याण, देशाचे कल्याण’, नारी शक्तीवर भर, पीएम आवास योजना अशा विविध
मुद्यांवर मार्गदर्शन करत अर्थसंकल्प २०२५ चे सविस्तर विश्लेषण करत
मार्गदर्शन केले. त्यानंतर
विद्यार्थी व प्राध्यापकांनी
अर्थसंकल्पावरील विविध तरतुदींबाबत प्रश्न विचारले व त्याचे
निरसन अगदी सोप्या शब्दात सिए
दर्शन जैन यांनी केले. सदर कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दिव्य छाजेड या विध्यार्थ्यानी
केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉली मंधान यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा.डॉ. विशाल राणा व प्रा. तन्मय भाले यांनी सहकार्य केले तर यावेळी महाविद्यालयातील
प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment