जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील “एमसीए”च्या विद्यार्थ्यांचा 'राम अँटीव्हायरस'ला अभ्यासदौरा
या भेटीत विध्यार्थ्यानी जाणून घेतली अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनीतील कामकाजाची माहिती ; विध्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग
जळगाव, ता. ०७ : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या ‘राम अँटीव्हायरस प्रायव्हेट लिमिटेड’ येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष एमसीए शाखेच्या तसेच बीसीएतील विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या अभ्यास भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
या क्षेत्रभेटीचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. शैक्षणिक अभ्यासक्रमादरम्यान शिकलेल्या कार्पोरेट पद्धती, तंत्रज्ञान अंमलबजावणी, सायबरसुरक्षा डोमेनमधील कार्यप्रवाह आणि सायबर सुरक्षा साधने या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या दौऱ्याची पार्श्वभूमी सांगताना नमूद केले.
महाराष्ट्रातील किंबहुना देशातील अँटीव्हायरस
या सॉफ्टवेअर क्षेत्रातील बळकटीकरणासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘राम
अँटीव्हायरस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची
कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली. या अभ्यासदौऱ्यात ‘राम अँटीव्हायरस प्रायव्हेट
लिमिटेडचे संचालक श्री. कल्याण दाणी यांनी इंडस्ट्रीजमधील विविध बारकावे सांगत मार्गदर्शन
केले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली.
रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा.
करिष्मा चौधरी, प्रा. विनीत महाजन व प्रा. रुपाली ढाके यांनी या अभ्यास दौऱ्याचे
समन्वय साधले तर या अभ्यास दौऱ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी
इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment