‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’: राज्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम - संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियान ; विद्यार्थ्यांची ग्रंथालय भेट, ग्रंथ प्रदर्शन व सामूहिक ग्रंथ वाचन
कार्यक्रम
जळगाव, ता. ११ : शहरातील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यासाठी १ ते १५ जानेवारी वाचन पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ११ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन आणि सामुहिक वाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच.
रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात
आले. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद
केले की, वाचन
संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राज्यातील वाचनसंस्कृतीला बळकट करण्यासाठी एक
महत्त्वाचे पाऊल आहे. अलीकडच्या काळात तरुण वर्ग हा वाचन संकृतीपासून दुरावत
चाललेला आहे. त्यामुळे तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. या
उपक्रमामुळे तरुण पिढीमध्ये ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होईल.
Comments
Post a Comment