जी. एच. रायसोनी महाविध्यालयाची स्वर्ण स्पर्श रिसोर्ट येथे “स्टाफ पिकनिक”

माइंडफुलनेस आणि विश्रांती-तणाव व्यवस्थापित करण्यासाठी सहलीचे आयोजन ; मोठ्या संख्येने प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर सहका-यांचा सहभाग

जळगाव, ता. ०४ : महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर सहका-यांचे स्ट्रेस मॅनेजमेंट, एकमेकातील स्ट्रॉंग नेटवर्क, माइंडफुलनेस व वेल बॉन्डिंग निर्माण करण्यासाठी तसेच नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने होऊन नवउर्जेने कामाला लागावे या उद्देशाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील व्यवस्थापनाच्या वतीने धुळ्यातील स्वर्ण स्पर्श रिसोर्ट येथे एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

रिसोर्टमध्ये आगमन होताच, डान्स फ्लोअरवरील लयबद्ध तालांवर सर्वांनी नृत्य करायला सुरुवात केली तसेच थिंग्स ऑफ द सॉंग, मिमिक्री, वन मिनिट गेम्स,पासिंग द बॅग यांसारखे खेळ खेळत स्वादिष्ट पदार्थ आणि आनंददायी मिष्टान्नांचा समावेश असलेल्या दुपारच्या जेवणानंतर ऍडव्हेंचर गेम्स, वॉटर गेम्स, स्वमिंग, क्रिकेट मॅच, व्हॉली-बॉल/फुट-बॉल आणि फ्लाइंग अश्या विविध खेळामध्ये सर्व सहभागी झाले व काही प्रमाणात फोटोग्राफी सत्र, जे त्या दिवसाच्या आनंददायी आठवणींना साठवून ठेवण्यासाठी मदत करेल यातही सर्वांनी हिरीरीने सहभागी होत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या रिसोर्टमधील विविध स्पॉटवरील आपल्या सेल्फी कॅप्चर केल्या.

या सहलीच्या समारोप कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी रायसोनी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यामुळेच रायसोनी इस्टीट्यूट सदैव यशोमार्गावरून वाटचाल करत आहे असा विश्वास व्यक्त करत सहकारी आनंदात असतील तरच संस्थेचा विकास होईल. अशा प्रकारचे कार्यक्रम एकमेकातील स्ट्रॉंग नेटवर्क, स्ट्रेस मॅनेजमेंट, माइंडफुलनेस व वेल बॉन्डिंग निर्माण करण्यासाठी मदत करतात तसेच माहिती तंत्रज्ञानाचा कामकाजात वापर सुरू असल्याने तत्परता, गती वाढली आहे, त्यासोबतच कर्मचाऱ्यांवर तणाव देखील वाढला आहे या अनुशंगाने वार्षिक सहली व क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव या अशा प्रकारच्या एकत्रीकरणातून प्राध्यापक-प्राध्यापकेत्तर सहका-यांचा तणाव कमी व्हावा व खेळकर व तणाव मुक्त कर्मचारीही रायसोनी इस्टीट्युटची ओळख बनावी, अशी अपेक्षा आमच्या समूहाचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांची आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सहलीचे संपूर्ण नियोजन अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रफिक शेख व प्रा. तन्मय भाले यांनी केले होते. तर सदर सहलीचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.     

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश