जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “जनजातीय गौरव यात्रे”चा समारोप
यात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण ; विध्यार्थ्यानी वाहिली श्रद्धांजली
जळगाव, ता. ७ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव यांच्या वतीने आयोजित जनजातीय गौरव यात्रेचा समारोप जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे भारतातील
विविध प्रांतातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान होते. अगदी त्याचप्रमाणे कमी
संसाधनांमध्ये पूर्वीच्या भारतीय स्वातंत्र्यासाठी जनजातीय समाजातील अनेक
क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे रान केले आहे. यामध्ये इस्लामी आक्रमक यांच्या
विरोधात लढलेल्या राणी दुर्गावती, महाराणा
प्रताप तसेच यांच्या सोबत लढलेले भिल्ल समाजातील योध्दे, इंग्रजांच्या विरोधात बिरसा मुंडा, तंट्या मामा भिल, गुलाम महाराज, राणी काजला आदी वीरांचा इतिहास या
यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय
विद्यार्थी परिषदेने ही जनजातीय गौरव यात्रा आयोजित केली होती.
दिनांक २ तारखेपासून अखिल भारतीय
विद्यार्थी परिषद आयोजित या जनजातीय गौरव यात्रेने जळगाव जिल्ह्यातील विविध १३
तालुक्यांमधील पन्नास गाव पाड्यांमध्ये जाऊन जनजागृती केली तसेच विविध ४५
शाळा/महाविद्यालय आणि २० वस्तीगृहांमध्येही ते जाऊन आले. या यात्रेच्या माध्यमातून
जनजातीय समाजामध्ये त्यांच्या इतिहासाबद्दल जागृती घडवून विकसित भारताला आकारास
आणण्यास जनजातीय समाजानेही आपले योगदान दिल्याचे अधोरेखित करणे असा या यात्रेचे प्रमुख
उद्दिष्ट होते. यावेळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयात या यात्रेच्या समारोप
कार्यक्रमाप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. सोनल पाटील, प्रा. डॉ. योगिता पाटील आदी उपस्थित
होते तसेच कार्यक्रमाचे समन्वय रजीस्टार श्री. अरुण पाटील यांनी साधले तर यावेळी स्टुडंट
कौन्सिलच्या विध्यार्थ्यासहित महाविद्यालयातील असंख्य विध्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन
केले.
Comments
Post a Comment