नेतृत्व व उत्कृष्ट वक्ते घडविण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयात नवनियुक्त “टोस्टमास्टर्स क्लब”चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
क्लबची धुरा सांभाळण्यासाठी कार्यकारिणी समितीची नेमणूक ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची उपस्थिती
जळगाव, ता. ४ : “टोस्टमास्टर्स क्लब” ही जागतिक संस्था आपल्या उपक्रमातून नेतृत्व व वक्तृत्व कौशल्य विध्यार्थ्यानी आत्मसात करत एक उत्कृष्ट वक्ता घडवणारी चळवळ असून विध्यार्थ्याच्या व्यक्तीमहत्वाचा विकास व्हावा या हेतूने नुकताच जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात (ऑटोनॉमस) टोस्टमास्टर्स क्लबचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या नवनियुक्त
समितीच्या पदग्रहण सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, क्लब इन्चार्ज - मृदुला
देशपांडे व मेंटर प्रा. प्रिया टेकवानी ह्यांनी हजेरी लावली. यावेळी रायसोनी टोस्टमास्टर्स क्लबची पहिली सभा संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जी. एच. रायसोनी महाविद्यालयात
विध्यार्थ्यांमधील वक्तृत्व व नेतृत्व या गुणवाढीसाठी “टोस्टमास्टर्स क्लब” हा आंतरराष्ट्रीय उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवीत असल्याचा
अभिमान असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी, सर्वांना उच्च गुणवत्तेचे स्कीलबेस शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे अन त्याचाच
आधार घेत आम्ही विध्यार्थ्यांच्या ३६० डिग्री होलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करीत
आहे, थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अॅक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात
राबविण्यात येतात यात मास्टर क्लब, लेट्स टोक क्लब, म्युझिक क्लब, डान्स क्लब, फॅब्रिकेशन क्लब, पिंक हॅट्स क्लब, फोटोग्राफी क्लब यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी
उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपक्रमाचा समावेश आहे. मुळात आजच्या काळात “टोस्टमास्टर्स क्लब” सारखे व्यासपीठ विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे कारण सुसंगत बोलण्याची कला
आणि विचार करण्याची सवय ही सरावाने तयार होते. नुसत्या बोलण्याचा सराव केला तर आज,
या ठिकाणी, उपस्थित माननीय च्या पुढे प्रगती नाही. विचार करून, मुद्देसूद बोलणे आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे याचा सराव व्हावा या हेतूने
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब” ची स्थापना करण्यात आली आहे तसेच या क्लबला आता “चार्टर्ड” दर्जा प्राप्त झाल्याने विध्यार्थ्यानी अधिकाधिक संख्येने या उपक्रमात सहभागी
होऊन आपले नेतृत्व कौशल्ये विकसित करावे अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
सदर स्थापना समारंभाचे आभार प्रदर्शन टोस्टमास्टर्स क्लबच्या मेंटर प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर साक्षी पोहाणी या विध्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. महाविध्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब” ची स्थापना झाल्याने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्री.श्रेयसजी रायसोनी यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त कार्यकारिणी समिती
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल ह्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या “टोस्टमास्टर्स क्लबची धुरा सांभाळण्यासाठी कार्यकारिणी समिती नेमण्यात आली आहे. वर्ष २०२४-२०२५ मधील कार्यकारणीत रायसोनी मेस्ट्रो फिनिक्स टोस्टमास्टर क्लबमध्ये स्वप्नील श्रावणॆ (अध्यक्ष), भाग्येश चौधरी (उपाध्यक्ष), देवेश्री भक्कड (सल्लागार), रिया भंगाळे- (एसएसए), प्रियल सोनावणे (स्पीच क्राफ्टर), साहिल वर्मा (स्पीच क्राफ्टर), अनुजा कुरकुरे (स्पीच क्राफ्टर), अक्षया दानी (स्पीच क्राफ्टर), रिहाल करमरकर (डिजिटल हेड) तसेच रायसोनी मेस्ट्रो ड्रॅगन टोस्टमास्टर क्लबमध्ये यशराज पाटील (अध्यक्ष) गोविंद मंधान (उपाध्यक्ष) रिया तळेले (सल्लागार) निधी बाजपाई (एसएसए), अनुष्का अनासाने (स्पीच क्राफ्टर), साक्षी पोहानी (स्पीच क्राफ्टर), प्रिया केवलरमाणी(स्पीच क्राफ्टर), खुशवंत नेरकर (स्पीच क्राफ्टर), नकुल महाजन (डिजिटल हेड) यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment