“स्वच्छता ही सेवा” अंतर्गत जी. एच. रायसोनी महाविध्यालयातर्फे ग्रामीण भागात विध्यार्थ्यानी राबविले स्वच्छता अभियान
राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग
दि. १७ ते १९ सप्टेंबर रोजी रायसोनीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाकडून शिरसोली
येथे ‘स्वच्छता रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपला
सहभाग नोंदवला. या रॅलीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिरापासून बारी
नगर, विवेकानंद स्कूल, श्रीराम चौक या मार्गे चिंचपूरा परिसरात स्वच्छतेविषयी जनजागृती केली तसेच शाळा, धार्मिक स्थळे, बस
स्थानक, गाव चावडी, मुख्य चौक, बाजार, चाळ आदी वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाकडून दि. २० ते २४ सप्टेंबर रोजी आकाशवाणी
परिसरामध्ये स्वच्छता अभियान व डोर टू डोर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. सदर
उपक्रमात इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील सुमारे ९० विद्यार्थ्यांनी व
प्राध्यापकांनी सहभाग घेतला. दि.२५ सप्टेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या विभागातील विद्यार्थ्यांनी दत्त नगर आणि वाणी
गल्ली परिसरामध्ये स्वच्छता विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या उपक्रमासाठी
विभागातील सुमारे १०० विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. सिव्हील इंजिनिअरींग
विभागातील सुमारे १६० विद्यार्थ्यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर
परिसरामध्ये स्वच्छता केली. दि. २८ सप्टेंबर रोजी सुमारे १७५ विद्यार्थ्यांनी घारे
वाडा परिसर आणि गिरणा नदी किनारा या परिसरात उत्स्फुर्तपणे स्वच्छता मोहीम
राबविली. दि. २९ सप्टेंबर रोजी एमबीए आणि एमसीए विभागाच्या सुमारे ७०
विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण नगर, अशोक नगर, इंदिरा नगर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम
राबविली. या सर्व स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये रायसोनी महाविध्यालयातील सुमारे ३०
प्राध्यापकांनीही सहभाग घेतला. ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत महाविद्यालयामध्ये देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले
होते. याशिवाय दि. ३० व १ ओक्टोंबर रोजी स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वसतिगृहांमध्ये
‘क्लीन रूम’ स्पर्धा तसेच स्वच्छतेची शप्पथ, आदी उपक्रम राबविण्यात आले तसेच दि. २ ऑक्टोबर
रोजी प्रा. डॉ. मुकुंद पाटील याच्या सहयोगाने “स्वच्छता हि सेवा” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविध्यालयात राष्ट्रीय
सेवा योजना विभागाकडून मानवी साखळी तयार करत शपथ घेण्यात आली
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक
डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम
अधिकारी प्रा. अमोल जोशी तसेच प्रा. योगेश वंजारी यांच्या सहयोगातून ‘स्वच्छता ही सेवा’ या
मोहिमेंतर्गत स्वच्छता विषयक सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले.
Comments
Post a Comment