सातत्यपूर्ण नवनवीन कृतीशील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुदृढ मानसिक आरोग्याचा लाभ : डॉ. नीरज अग्रवाल

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये 'शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य' या विषयावर कार्यशाळा: विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव, ता. १९ : शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मुलांनी सतत नाविन्यपूर्ण कृती करत राहिल्या पाहिजे. त्यामुळे मुलांची सर्जनशीलता वाढते असे प्रतिपादन अग्रवाल डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. नीरज अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील 'शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य' या विषयावरील कार्यशाळेत व्यक्त केले.

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा या होत्या त्यांनी या उपक्रमाची प्रस्तावना मांडताना नमूद केले कि, सामाजिक व भावनिक बांधिलकी निर्माण होण्यासाठी किशोरावस्था हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. नियमित आहार, व्यायाम, झोपण्याच्या वेळा व त्याचे महत्त्व अशा महत्त्वाच्या सवयी या वयातच रुजविल्या जाणे हे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते. तसेच आंतरिक व आंतरवैयक्तिक समस्यांचे आकलन करून त्या सोडवणे हे शिकण्याचे कौशल्य निर्माण होणे गरजेचे असून त्याचप्रमाणे भावनिक संतुलन देखील साधता येणे तितकेच महत्त्वाचे आहे तसेच डॉ. नीरज अग्रवाल यांचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडेल असे मत मुख्याध्यापिका श्रीमती परेरा यांनी व्यक्त केले.

यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. नीरज अग्रवाल यांनी पुढे नमूद केले कि, ब-याच गोष्टींवर शालेय विद्यार्थ्यांचे मनःस्वास्थ्य अवलंबून असते. वेगवेगळ्या कारणांमुळे होणारा तणाव त्यांच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करतो. पीअर प्रेशर, स्वायत्ततेची गरज, टेक्नॉलॉजीची भरपूर उपलब्धता व वापर या सर्व गोष्टी तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरतात. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनामधील बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होत असलेली विद्यार्थ्यांची नकारात्मक विचारसरणी, अनपेक्षित भावनिक गुंतागुंत, मित्र-मैत्रिणी, पालक व परिजनांकडून असणारे अपेक्षांचे ओझे व त्यामुळे होणारे अपेक्षाभंग, उद्भवणारे नैराश्य या व अशा अनेक समस्यांना सामोरे जात असताना शालेय विद्यार्थ्यांच्या मनाची होणारी द्विधावस्था टाळण्यासाठी उत्तम मानसिक आरोग्य जोपासणे महत्वाचे असून त्यासाठी त्यांनी आपल्या शारीरिक, भावनिक, सामाजिक, अध्यात्मिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान देखील डॉ. नीरज अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेरोनिका मॉरिस यांनी केले तसेच आभार शाळेच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश