जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहाने साजरा
प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन
जळगाव, ता.१५ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय येथे आज ता. १५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रथमवर्ष
विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर, रजिस्टार अरुण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच
उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.
यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा.
डॉ. प्रिती अग्रवाल यांनी आपल्या भाषणात, बालपणापासूनच वाचन संस्कार होणे गरजेचे
आहे. आपल्याकडे वाचन साहित्य विपुल आहे.
विविध संदर्भ ग्रंथ, कादंबऱ्या, वर्तमानपत्रे, नियतकालिके, ईबुक्स
यांचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती संदर्भात जागरूकता वाढवणे गरजेचे असून
दैनंदिन जीवनप्रणालीत वाचते व्हा. वाचनामुळे विविध क्षेत्रातील माहिती आपणास
मिळते.वाचाल तर वाचाल असा संदेश त्यांनी दिला. वाचनाचा प्रारंभ आजपासून करा आणि
आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर कार्यक्रमाच्या
शेवटी अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी उपस्थित सर्वांना 'वाचन प्रेरणा दिना'च्या शुभेच्छा देऊन भारतरत्न माजी
राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल
कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या
दिवसाचे महत्त्व विशद करताना डॉ. कलाम यांच्या 'अग्निपंख'
या पुस्तकाची माहिती डॉ. शेखावत यांनी विद्यार्थ्यांना दिली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. जितेंद्र वढदकर यांनी केले.
तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री.
सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment