राष्ट्रप्रगतीसाठी सामाजिक भान आणि नेतृत्वगुण जोपासा : प्रा.यजुर्वेंद्र महाजन

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकी व व्यवस्थापन प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न

जळगाव,ता. १४ : 'आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा. जे काही करायाचे आहे, ते सर्वोत्तम करा. कृती आणि उक्तीत सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते, तसेच समाजाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करणाऱ्या माणसाचे जीवन कृतार्थ ठरते, असे मत नामवंत व्याख्याते व दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय यांच्यातर्फे प्रथम वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रारंभ या स्वागत समारंभ कार्यक्रमात श्री. महाजन बोलत होते. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील आदी उपस्थित होते.

सदर अध्यक्षीय भाषणात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महाविध्यालयात नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचे स्वागत करत नमूद केले कि, विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या आजच्या प्रमुख वक्त्याचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडणार आहे तसेच विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास व क्षमता ओळखत वेळेवर मेहनत करून योग्य निर्णय घ्यावेत. यामुळे तुमच्या यशाचे मार्ग नेहमी खुले राहतील. तसेच रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापककौशल्य विकास कार्यशाळा, उत्कृष्ठ ग्रंथालय, यासहीत थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानाला प्राधान्य देत विविध अँक्टिव्हिटी देखील महाविद्यालयात राबविण्यात येतात यात मास्टर क्लब, लेट्स टोक क्लब, म्युझिक क्लब, डान्स क्लब, फॅब्रिकेशन क्लब, पिंक हॅट्स क्लब, फोटोग्राफी क्लब यासारख्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देत रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांनी नमूद केले कि, आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने कम्पर्ट झोन च्या बाहेर येत नॉलेज, अॅटीट्युड व स्कील हि त्रिसूत्री आत्मसात करायला हवी. जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा तसेच प्रॉब्लेम सोल्विंग अप्रोच व सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. आपल्या जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरु असतात त्यांचा सदैव आदर करत त्यांचे मार्गदर्शन घ्या तसेच दिव्यांगांची सेवा हे ईश्वरी कार्य आहे. कदाचित ज्यांना काही व्यंग आहे, त्यांची सेवा करता यावी, यासाठीच ईश्वराने आपल्याला सर्वांगाने सुंदर व स्वस्थ बनवले आहे. समाजातील गरजूंना आपण काहीतरी देणे लागतो, या दातृत्व व कृतज्ञतेच्या भावनेतून निःस्वार्थ सेवाकार्य करावे असे मत प्रा. यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. जितेंद्र वढदकर यांनी साधले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश