जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “अग्निशमन सुरक्षे”चे लाईव्ह प्रशिक्षण
उपक्रमासाठी महाविद्यालयातील "रासेयो" विभागाचा पुढाकार ; आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांनी गिरविले "अग्निशमन'चे धडे
जळगाव,ता. ९ : जळगाव अग्निशमन विभागाकडून स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयामधील विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांना आग रोखण्याबाबत प्रात्यक्षिके देण्यात आली. आगीसारखा बाका प्रसंग उद्भवल्यास काय खबरदारी घ्यावी, याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, अग्निसुरक्षा तज्ञ प्रशांत बोरनारे व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यासह असंख्य विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, कोणतीही आपत्ती सांगून येत नाही मात्र आपत्ती ओढवलीच तर तातडीने कोणत्या उपाययोजना करायच्या तसेच आपत्ती येऊच नये यासाठी कशी खबरदारी घेता येईल, याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेला हा कार्यक्रम खरोखर कौंतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक अग्निसुरक्षा तज्ञ प्रशांत बोरनारे यांनी “अग्निशमन सुरक्षे”चे लाईव्ह प्रशिक्षण देतांना सांगितले कि, आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ आग विझवण्यासाठी महाविद्यालयामध्ये ठीक ठिकाणी फायर एक्स्टींग्यूशर (अग्निशामक यंत्र) बसवलेले असते. मात्र ते कसे चालवायचे याबाबत प्रशिक्षण नसल्याने अनेकदा मोठी दुर्घटना घडते.तसेच एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर तिथून सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचावे. तसेच इतरांची मदत कशाप्रकारे करावी, याबाबत अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविली. तसेच विद्यार्थ्यांचा सरावही करून घेतला.आग लागल्यानंतर प्रथम अग्नीशमन विभागाला माहिती द्यावी. त्यानंतर अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने आग विजवण्याचा प्रयत्न करावा. परिसरातील विद्युत पुरवठा बंद करावा. आग पसरू नये याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment