“जुनून” असणारी माणसंच खरी क्रांती घडवू शकतात : श्री.हेमंत भिडे

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात जुनूनया शिर्षकाखाली प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न

जळगाव, ता. २३  : सध्याच्या युगात इंटरनेट व डिजिटल मीडिया आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. संभाषण चातुर्यहे विशेष कौशल्य सध्या खूप महत्त्वाचे झाले आहे. आजच्या जगात प्रभावी संभाषण हेच प्रगतीचे उत्तम साधन आहे. सूत्रसंचालन-निवेदन, व्यावसायिक वक्ता, मॅनेजमेंट व मोटिव्हेशनल प्रशिक्षक या विविध करिअरची भुरळ अनेकांना सध्या पडते आहे. तसेच करिअर निवडताना येणारा ताण, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, त्यात कमी मार्कांमुळे असलेली निराशा व डळमळीत आत्मविश्वास यावर उपस्थित विद्यार्थ्यांना जुनूनअसणारी माणसंच खरी क्रांती घडवू शकतात असे मनोगत गेली अनेक वर्षे उद्योग क्षेत्रात काम करणारे वक्ते, संभाषण चातुर्य प्रशिक्षक व फाउंडेशन ब्रेक प्रा. लि.चे हेमंत भिडे यांनी स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटीलएमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की,  यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असा यशाचा कानमंत्र देत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व म्युझिक क्लब, डान्स क्लब, लेट्स टोक क्लब, टोस्ट मास्टर क्लब, फोटोग्राफी क्लब या विविध हॉबी क्लबची माहिती देत या क्लब मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. व या विविध क्लबमुळे विध्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, टीमवर्क स्किल हे सारे कौशल्य आत्मसात होण्यास मदत हौवून ही यशस्वी करिअरची एक उत्तम सुरवात आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तुम्ही तुमचे करिअर उच्च स्तरावर नेऊ शकता व आजच्या काळात असे सर्वगुण संपन्नच युवकांची इंडस्ट्रीला गरज असल्याचे सांगितले तसेच परदेशात शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. असे असतानाही आर्थिक आणि भाषिक मजबुरीसह कठीण परीक्षांमुळे बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. जर्मन, जपान, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या सर्व देशांत शिकण्यासाठी तेथील भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (IELTS) ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जळगाव शहरातील अनेक विद्यार्थी पदवीनंतर स्वतःहून परदेशात शिकत असले तरी बहुतेक विध्यार्थी भाषाज्ञानामुळे मागे पडतात. याच बाबीचा मागोवा घेत रायसोनी महाविध्यालयाने आपल्या अभ्यासक्रमात इलेक्टीव विषय देत जर्मन, जपानी, फ्रेंच या भाषेचे वर्ग सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना या तीनपैकी कुठल्याही दोन भाषा शिकणे सक्तीचे आहे तसेच महाविध्यालयात तिघेही भाषांचे प्राथमिक आणि प्रगत वर्ग घेतले जातात. यामध्ये देश विदेशातील भाषातज्ज्ञ भाषेचे वर्ग घेतात. यामुळे विद्यार्थ्यांची भाषेवर पकड मजबूत होत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात मेजर व मायनर प्रोग्राम, अॅकडमिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु असून या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रथम वर्षविद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी सांगितले. यानंतर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी म्हटले कि, करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना होईल. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी ? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा ?  या विषयांवर करिअर समुपदेशक श्री. हेमंत भिडे हे उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील प्रश्न सोडवतील. तसेच आपल्या यशस्वी भविष्यासाठी प्रत्येक युवकाने कम्पर्ट झोन च्या बाहेर येत नॉलेज, अॅटीट्युड व स्कील हि त्रिसूत्री आत्मसात करायला हवी. जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा तसेच प्रॉब्लेम सोल्विंग अप्रोच व सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात श्री. हेमंत भिडे पुढे म्हणाले की शिक्षण असो कि अन्य क्षेत्र हमखास यश मिळविण्यासाठी आधी पाया पक्का करा, फोकस नीट ठेवा, जिद्द, चिकाटी व मेहनत हे गुण आत्मसात करा, आपल्याला करीयर घडवायचे असेल आणि नाव कमवायचे असेल तर सर्वात आधी मनातला न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आपण इतरांपेक्षा कमी आहोत, ही भावना काढून टाका. मध्यमवर्गीय घरातल्या विद्यार्थ्यांना परिस्थितीने पैलू पडलेले असतात. संकटांना सामोरे जाण्याची कणखर मानसिकता तुमच्यात असते. त्यामुळे या स्पर्धेच्या युगातही तुम्ही जगण्याच्या लढाईत इतरांपेक्षा काकणभर सरस असता. शिक्षण असो अथवा अन्य कोणतेही क्षेत्र त्यात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीपासूनच पाया पक्का ठेवा तसेच गणित, इंग्रजी या विषयावर अधिक लक्ष केंद्रीत करा, त्याच बरोबर जनरल नॉलेजवर भर द्या. स्पर्धा परिक्षेत अधिक फायदा होईल. केवळ पाठांतरावर भर देण्यापेक्षा विश्लेषण, कल्पकता, स्वंयस्फूर्तीने पुढे येत नवनवीन शिकण्याची आस ठेवा, असे आवाहन करीत हेमंत भिडेनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यास कसा करावा यापासून ते कोणकोणत्या क्षेत्रात करियर करता येईल, त्यासंदर्भातील शिक्षण संस्था, प्रवेश प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा व आभार प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी मानले तसेच यावेळी प्रा.तन्मय भाले, प्रा. रफिक शेख व आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश