“रायसोनी प्रिमियर क्रिकेट लीग”चे थाटात आयोजन

अठरा संघांचे १८० खेळाडू उतरले मैदानावर ; सामन्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमीची हजेरी

जळगाव, ता. : क्रीडा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारे अग्रगण्य स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या वतीने आयोजितजी. एच. रायसोनी प्रीमियर क्रिकेट लीग२०२४ स्पर्धेचे जळगाव शहरातील रॉयल टर्फ मैदानात दिमाखात उद्घाटन झाले.

उद्घाटन कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी उद्घाटन सोहळ्याच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले कि,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी अभ्यासक्रम आणि सह-अभ्यासक्रमाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.आणि या अनुषंगानेजी. एच. रायसोनी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा त्याचाच एक भाग आहे. गेल्या काही काळात आम्ही जिल्हा राज्यस्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात जळगाव जिल्हा अग्रेसर बनावे, यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट ॅन्ड कल्चरल फाउंडेशन विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू असल्याचे सांगत या भव्य क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयातील क्रीडा समन्वयकांचे अभिनंदन केले. यानंतर जिल्हा क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे नेहमी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविताना दिसते तसेच या स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रिया होत असून यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होतांना खेळाडूंनी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितच यश प्राप्त होते, असे प्रतिपादन केले.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, रोहित साळुंखे, प्रा. श्रिया कोगटा जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सागर सोनवणे यांनी समन्वय साधले. या स्पर्धेला असंख्य जळगावकरांकडून भरघोस प्रतिसाद लाभला. नवोदित खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी अत्यंत चुरशीच्या सामन्यांची मेजवानी जळगावकरांना मिळाली. तसेच शहरातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी देखील यावेळी मिळाली. सदर स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश