जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिसांना राख्या बांधून केला “रक्षाबंधन” सण साजरा

उपक्रमासाठी महाविद्यालयातील "रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायसोनी"चा पुढाकार ; अनोखा उपक्रम साजरा करत जपली सामाजिक बांधिलकी

जळगाव, ता. १९ : रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून आपल्या भावाकडून प्रत्येक संकटात आपल्या रक्षणाची हमी घेत असते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनही महिला व मुलींच्या सक्षमीकरण व सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे आपल्या समाजाच्या रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून एक सामाजिक सलोखा जपला. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी, कायद्याचे राज्य अबाधित राहावे व समाजाचे रक्षण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून त्याची पोचपावती म्हणून रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायसोनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानातून पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव शहरातील जिल्हा पेठ, शहर व एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व अंमलदार बांधवांना राख्या बांधून खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून आपल्या भावाकडून प्रत्येक संकटात आपल्या रक्षणाची हमी घेत असते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनही महिला व मुलींच्या सक्षमीकरण व सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत असते. त्यामुळे आपल्या समाजाच्या रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच यावेळी पोलीस बांधवानी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना करिअर, स्वसंरक्षण व ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच जळगाव पोलीस दलामार्फत महिला व विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी व रक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या निर्भया पथक, डायल 112, भरोसा सेल, सायबर सेल ‘सायबर सेफ वूमनआदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच जळगाव पोलीस दलाने सुरु केलेल्या सायकल पेट्रोलिंग, डायल 112 व निर्भया पथकामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित वाटत असून त्यांच्यामध्ये पोलीस दलाप्रती कृतज्ञतेची भावना असल्याचे मत विद्यार्थींनीनी व्यक्त केली व भावासारखेच रक्षणासाठी सदैव पाठीशी उभे असल्याबद्दल जळगाव पोलीस दलाचे आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. श्रिया कोगटा यांचे सहकार्य लाभले तर याप्रसंगी सेजल बाहेती, मोनालिसा साहू, नेहा वाणी, सुजल परदेशी, वंश कांकरिया, दिव्या जैन, प्रियांका शर्मा, वैष्णवी घुगे, रोशनी जैन, मयंक रायसिंघानी, खुशाल अग्रवाल हे विध्यार्थी उपस्थित होते.सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश