जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

विद्यार्थी, प्राध्यापक व पालकांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती

जळगाव, ता. १५ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परंपरेनुसार कुनाल जैन व कुशल पाटील या महाविद्यालयात

प्रथम क्रमाकांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना नमुद केले की, विकसित भारत हे काही फक्त आकर्षक अथवा लक्षवेधी वक्तव्य नसून तो आपल्या सर्वांचा उद्देश आहे. हे आपण स्वतःला दिलेले एक लक्ष्य आहे. त्यामुळे ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे.

प्रत्येक देश त्याच्या इतिहासातील एक टप्पा अनुभवतो जेव्हा तो त्याच्या विकासाच्या प्रवासाला अनेक पट पुढे नेतो. हे त्या राष्ट्रासाठी ‘अमृत काळ’ म्हणजेच सुवर्ण युग सारखे आहे. भारतासाठी हा ‘अमृत काळ’ आता आला आहे. भारताच्या इतिहासातील हा तो काळ आहे जेव्हा तो प्रचंड मोठी झेप घेणार आहे. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य उदाहरणे आहेत की ज्यांनी ठराविक काळात अशी प्रचंड मोठी झेप घेतली आणि स्वतःचे रूपांतर विकसित राष्ट्रांमध्ये केले, आता भारताची वेळ आली आहे, हीच योग्य वेळ आहे. या ‘अमृत काळ’च्या प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग केला पाहिजे; आपण एक क्षणही गमावू शकत नाही.स्वातंत्र्यासाठीचा आपला प्रदीर्घ लढाही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य हेच अंतिम उद्दिष्ट मानून, एका ध्येयाने, उत्साहाने आणि निर्धाराने आम्ही रणांगणात उतरलो तेव्हा आम्ही यशस्वी झालो.  हा तो काळ होता जेव्हा तरुणांमध्ये स्वातंत्र्याविषयीची नवी जाणीव सर्व प्रवाहांमध्ये पसरली होती. 

स्वातंत्र्यासाठी समर्पित एक संपूर्ण पिढी उदयास आली. जे काही करायचे आहे ते स्वातंत्र्यासाठी केले पाहिजे आणि ते आता केले पाहिजे, अशी विचारधारा देशात निर्माण झाली होती. या अनुषंगाने आता तुमची ध्येये, तुमच्या संकल्पांचे एकच उद्दिष्ट असले पाहिजे - ‘विकसित भारत’. एक विद्यार्थी व शिक्षक या नात्याने, देशाला ‘विकसित भारत’चे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा, भारताच्या वेगवान विकासासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरी विचार करा की भारत विकसित होण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करण्यासाठी काय आणि कसे केले जाऊ शकते? असा मौलिक संदेश डॉ. अग्रवाल यांनी यावेळी दिला.या कार्यक्रमात रायसोनी महाविद्यालयाच्या म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी राष्ट्रध्वजास मानवंदना देत विविध देशभक्तीपर गीते सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल श्रावणे व राजश्री बोरसे यांनी केले तर यावेळी अकॅडमिक डीन प्रा.डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश