जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “राष्ट्रीय अँन्टी रॅगिंग दिन” मोठ्या उत्साहात साजरा

रॅगिंग प्रतिबंधात्मक पथनाट्य सादर करून जनजागृती ; विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

जळगाव, ता. १४ : भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने 12 ऑगस्ट 2024 हा दिवस राष्ट्रीय अँटी रॅगिंग दिवस व भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयात 12 ते 18 ऑगस्ट हा सप्ताह राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय येथे 12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अँन्टी रॅगिंग दिन साजरा करण्यात आला

यावेळी अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, समन्वयक प्रा. जितेंद्र वढ्दकर यासह असंख्य विद्यार्थी,प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी रॅगिंग म्हणजे काय ?, अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. समन्वयक प्रा. जितेंद्र वढ्दकर यांनी वस्तीगृहात शिस्तीचे पालन करून खेळेमिळीचे वातावरणात वास्तव्य करावयास संबोधित केले. सदर कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना लघुपट आधारित त्याबद्दल माहिती दाखवण्यात आली त्यामध्ये अँटी रॅगिंग वेबसाईट, टोल फ्री क्रमांक, तक्रार नोंदणी प्रक्रिया, इत्यादी बाबींचा समावेश होता तसेच रॅगिंग प्रतिबंधात्मक पथनाट्य सादर करून जनजागृती देखील महाविध्यालय परिसरात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल जोशी तर आभार प्रा. मुकुंद पाटील यांनी मानले.  

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश