जी. एच. रायसोनी प्ले स्कूलमध्ये “मैत्रीदिन” उत्साहात साजरा
जळगाव, ता. १ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित “जी. एच. रायसोनी प्ले स्कूल”मध्ये प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीदिन उत्साहात साजरा केला. स्कूलच्या संचालिका सौ. पलक रायसोनी यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापिका तेजल ओझा यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात आला. भारतामध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे मित्र- मैत्रिण जोडले जातात पण आयुष्यात शाळेच्या दिवसांत झालेले मित्र खास असतात याच बाबीचा मागोवा घेत सावखेडा येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित “जी. एच. रायसोनी प्ले स्कूल”'मध्ये फ्रेंडशिप डेचं औचित्य साधत हा दिवस खास जपण्यासाठी, व त्यामधील जिव्हाळा टिकवण्यासाठी आणि मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी येथे फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून यावेळी नृत्य, गायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यात आले. मैत्रीदिनाच्या निमित्ताने स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना फ्रेंडशिप ब्रॅंड बांधले. तसेच चॉकलेट, बिस्कीटे देऊन मैत्रीचे नाते अधिक घट्ट केले.
Comments
Post a Comment