स्किल बेस्ड “एनपीटीईएल कोर्स” मध्ये जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे १४ विध्यार्थी अख्ख्या भारतातून “अव्वल”

६० टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष , तर ४० टक्के “ ऑनलाईन शिक्षण ” देण्यावर महाविद्यालयाचा भर ; टॉपर्स विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक जळगाव , ता. २० : एमएचआरडी व एआयसीटीई द्वारे दिशादर्शक व वित्तपुरवठा केलेला हा उपक्रम असून आय.आय.टी.च्या समनव्यातुन घडलेल्या ऑनलाईन एनपीटीईएलने जानेवारी ते एप्रिल सत्राचा निकाल जाहीर केला आहे. यात संपूर्ण भारतातून ९५६ विध्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यापैकी ८५२ विद्यार्थ्यांना यश मिळाले असून त्यात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील १३ विध्यार्थी व १ प्राध्यापक हे राष्ट्रीय स्तरावर कोर्स टॉपर झाले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाविध्यालयीन अभ्यासक्रमात अनेक आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. 60 टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष , तर 40 टक्के ऑनलाईन शिक्षण देण्याचा यात समावेश असून या बाबीचा मागोवा घेत शहरातील जी. एच. रायसोनी महाविध्यालय हे एकमेव एनईपीची पॉलिसी १०० टक्के राबवीत असून खानदेशातील विविध भागातील विध्यार्थ्यांना हि एक अमुल्य संधी देत त्याच धर्तीवर नुकतेच जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील विध्यार्थ...