“विक्रीतून व्यवस्थापनाचे धडे” घेण्यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी उतरले “रस्त्यावर”
तेजी हो या मंदी खूब चलेगी “मंडी” – रायसोनीचा उपक्रम ; शहरवासीयांनी देखील केले विध्यार्थ्यांचे कौतुक
जळगाव, ता. ९ - उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम रायसोनी मंडीतून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविदयालयामध्ये रायसोनी-मंडी २०२४ या उपक्रमाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विक्री तसेच अनुभव कथन या पद्धतीने हा तीन दिवसीय उपक्रम संपन्न होणार आहे. उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी आर चौधरी, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, श्रद्धा मैट्सचे सीएमडी महेंद्र रायसोनी, बियाणी पोलीमर्सचे संचालक विनोद बियाणी, सी.ए.प्रिती मंडोरे हे उपस्थित होते. यावेळी उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, २००८ म्हणजेच महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आम्ही रायसोनी-मंडी हा उपक्रम राबवीत आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये समाविष्ट असलेल्या विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप आधीपासूनच आमच्या महाविद्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. मुख्यतः “बिजनेस मॅनेजमेट” हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमातून विध्यार्थी “लर्निग बाय सेलिंग” शिकतात म्हणजेच कि विध्यार्थ्यांना यातून नेतृत्व, टीमवर्क, टार्गेट सेट, नेट्वर्किंग, अर्थशास्त्र, अकाउंट, नियोजन, डीसीजन मेकिंग यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजांची जाणीव त्यांनी समजून घ्यावी, वस्तूचे महत्व जाणून बाजारात उतरावे, तसेच आत्मविश्वास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, या गुणांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने रायसोनी मंडी हा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे. “बेहतर कमाई के लिए,बेहतर पढाई” असे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या उपक्रमात मुंबई येथील एका सामाजिक संस्थेतून एक लाखाच्या वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या असून २०० विद्यार्थ्यांचा सहभाग यात आहे. उत्पादन विक्रीच्या माध्यमातून मिळणारा पैसा सामाजिक उपक्रमांसाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण व आरोग्यासाठी दिला जाणार असल्याचे संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले. यानंतर धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी म्हटले कि, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट सतत विविध उपक्रम राबवित असते. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा आत्मविश्वास प्रबळ होतो. “मंडी” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी नक्कीच मिळेल.तसेच उत्पादनाची संपूर्ण माहिती विक्रेत्याला असायला हवी. अवगत भाषेवर प्रभूत्व महत्वाचे आहे. कोणतेही काम करीत असताना पारदर्शकता महत्वाची भूमिका पार पाडते याची जाणीव ठेवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर सी.ए.प्रिती मंडोरे यांनी म्हटले कि, व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो. तसेच व्यवसाय करणे सोप नसून पात्र शिक्षण, नेतुत्व करण्याचे धाडस, जबाबदारी, व्यवसायाची सुरक्षितता आणि वेळोवेळी करावी लागणारी सुधारणा या बाबी व्यवसाय क्षेत्रात महत्वाच्या ठरतात असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर श्रद्धा मैट्सचे सीएमडी महेंद्र रायसोनी यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, वस्तू विक्रीचे धडे आपल्या आतून विकसित झाली पाहिजेत. आयुष्यात मनातील भिती कायमची काढून टाका तरच यशस्वी होता येईल. स्वतः प्रती चुकीची धारणा ओळखायला शिका. व्यवसाय करण्यासाठी पुस्तकीज्ञाना इतकाच अनुभव महत्वाचा असतो आणि ते अनुभव रायसोनी मंडी सारख्या उपक्रमातून मिळतो असे ते म्हटले, यांनतर बियाणी पोलीमर्सचे संचालक विनोद बियाणी यांनी मंडी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.विद्यार्थ्यानो, वस्तू विक्री करतांना तुमचा प्रेमळ स्वभाव देखील महत्वाचा ठरतो असे मत श्री. बियाणी यांनी व्यक्त केले. तसेच व्यवसायाचे प्रात्यक्षिके घेण्याचे व्यासपीठ मंडी असून यात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना उत्पादन विक्रीचे प्रात्यक्षिक दाखवून काही वस्तू विकल्यात. तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मंडीच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. विशाल सुनील राणा, प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. श्रेया कोगटा यांनी साधले तसेच यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. तन्मय भाले, प्रा. प्राची जगवानी, प्रा. सरोज पाटील व आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे व आभार प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी मानले. तसेच या उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment