जी. एच. रायसोनी महाविध्यालयात स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य महा”रक्तदान” शिबिर संपन्न
रक्तदान शिबिरात १५० रक्त पिशव्या संकलीत करत गाठला विक्रमी आकडा ; विध्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, ता. ५ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे प्रेरणास्थान स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्त भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते स्व. ग्यानचंदजी रायसोनी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करून करण्यात आले. यावेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. श्रेयस रायसोनी, एचआर हेड श्री. अश्विन पांडे, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सिनियर सायंटीफिक ऑफिसर राजेश शिरसाठ, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मिनू वर्गीस, समाजसेवा अधिकारी जितेंद्र पाटील व महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सहकारी आणि महाविद्यालयातील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून रक्तदानाकरीता आवाहन केले व शिबिर कालावधीत रक्तदात्यांची आस्थेने विचारपूस करून मनोबल वाढविले. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया विभागप्रमुख, प्राध्यापक व विध्यार्थ्यांना समजावून सांगितली. महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकारी यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर सहकाऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण २५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला व एकूण १५० रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले. शिबिराच्या समारोपावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सिनियर सायंटीफिक ऑफिसर राजेश शिरसाठ व रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मिनू वर्गीस यांनी महाविद्यालयास स्मृतीचिन्ह व गौरव पत्र देवून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. तसेच विध्यार्थ्यांचा उत्साह व शिबिराचे सुव्यवस्थित आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. या शिबिराकरिता रायसोनी इस्टीट्यूटचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक प्रा.अमोल जोशी, प्रा. वसीम पटेल, गणेश पाटील, अजय चौधरी, शीतल जैन, आसिफ पिंजारी व महेंद्र ढोणे यांनी संयोजनाची भूमिका पार पाडली. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment