विविध जिल्ह्यातील २०० खेळाडूंचा
उत्स्फूर्त सहभाग ; तब्बल ४५ हजार रकमेची रोख पारितोषिके व चषक होणार विजेत्यांना वितरीत
जळगाव, ता. १६ : जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल
फाउंडेशनतर्फे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालय तसेच
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या हिरवाईने नटलेला परिसर, प्रशस्त क्रीडांगण, जिल्हाभरातील दिग्गज व उदयोन्मुख
खेळाडू व पदाधिकाऱ्यांचा सहभागात शुक्रवारी तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा
स्पर्धेला प्रारंभ झाला.महाविद्यालयातील व स्कूलमधील या
स्पर्धेत जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. महाविद्यालयातील उद्घाटन
कार्यक्रमात जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.एल.पी.देशमुख, मू.
जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक
डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड कल्चरल फाउंडेशन व पुणे कॅम्पस मार्केटिंग हेड अमितासिंग या
उपस्थित होत्या तर महाराष्ट्र खोखो असोसीएशनचे सचिव जयांशु पोळ, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण
ठाकरे, शिवछत्रपती
पुरस्कार प्राप्त अलिशा खान तसेच जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका
तेजल ओझा यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उद्घाटन सोहळ्याच्या
प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत
यांनी जळगाव शहराच्या एका टोकाला असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयात व
दुसऱ्या टोकाला असलेल्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आज जिल्हास्तरीय
मैदानी क्रीडा स्पर्धा होत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता भविष्यात येथे
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. आज पेटवलेली मशाल केवळ एका
स्पर्धेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक खेळाडूने वर्षभर ती स्वत:च्या मनात धगधगती
ठेवावी, असे
आवाहन त्यांनी केले. यानंतर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख
यांनी एखाद्या क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव शहरात तब्बल ४५ हजार रकमेची रोख
पारितोषिके वितरीत होणार असल्याने, खरोखर हि एक कौतुकास्पद बाब
आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालय व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल नेहमी
विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविताना दिसते तसेच या
स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रिया होत असून यामधून भविष्यातील
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होतांना खेळाडूंनी
आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितच यश
प्राप्त होते, असे
प्रतिपादन त्यानी केले. यानंतर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करतांना नमूद केले कि, गेल्या काही वर्षांत आम्ही जिल्हा व
राज्यस्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय
आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात जळगाव जिल्हा अग्रेसर बनावे, यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट अॅन्ड
कल्चरल फाउंडेशन विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू असल्याचे सांगत “जी. एच. रायसोनी” महाविद्यालय व पब्लिक स्कूलमध्ये १६ ते
१८ दरम्यान होत असलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा त्याचाच एक भाग आहे असे
सांगत या भव्य क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्कूल व महाविद्यालयातील
क्रीडा समन्वयकांचे अभिनंदन केले. यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या
मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले कि, व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे
आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून
मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र
अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते. स्पर्धेत भाग घेणारे संघ, त्यांचे खेळाडू, उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व
स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून आम्ही तिघे दिवस हि स्पर्धा यशस्वी
करण्याच्या प्रयत्नात आहोत व भविष्यातही अश्याच दर्जेदार राष्ट्रीय स्तरावरील
स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे असे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेच्या
यशस्वीतेसाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे, क्रीडाशिक्षक संजय चव्हाण, कमलेश नगरकर तसेच जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाचे क्रीडा संचालक जयंत जाधव व राहुल धुळणकर हे परिश्रम घेत आहेत.
यावेळी शहरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सदर उद्घाटन
सोहळ्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष
श्री. सुनीलजी रायसोनी यांनी कौतुक केले.रायसोनी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध
स्पर्धा
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे यात
विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी कॅरम, चेस, स्विमिंग, स्पीड स्केटिंग व बास्केटबॉल या
जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार असून यात रुस्तमजी इंटरनॅशनल
स्कूल, विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, ओरियन स्कूल, पोद्दार स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, जिजामाता स्कूल, गुरुकुल स्कूल, सेंट तेरेसा स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, अनुभूती स्कूल, बोहरा इंटरनॅशनल
स्कूल, एसजीएस हायस्कूल, शिंदे इंटरनॅशनल स्कूल, बालविश्व स्कूल यासह पाचोरा व एरंडोल
येथील विविध शाळांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. तसेच विजेत्यांना १० हजार रुपये
रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या विविध स्पर्धाचे परीक्षण प्रवीण
ठाकरे- बुद्धिबळ, आयशा
खान- कॅरम व बबलू पाटील- बास्केटबॉल हे करणार आहे.
रायसोनी महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा आविष्कार
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस
मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या क्रीडांगणावर जळगाव जिल्हा सेव्हन अ
साईड फुटबॉल असोसीएशनच्या मान्यतेने “फुटबॉल” स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत जळगाव,
धुळे व नंदुरबार या जिल्हातील एकूण ३१ संघांचा समावेश असून या
स्पर्धेसाठी विजेत्यांना तब्बल ३५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात
येणार आहे. या स्पर्धेत विनीत फुटबॉल क्लब, नंदुरबार फुटबॉल
क्लब, भुसावळ फुटबॉल क्लब, स्टार्स
युनायटेड फुटबॉल क्लब, अक्सा फुटबॉल क्लब, आझम अकॅडमी, अमळनेर फुटबॉल क्लब, एअर स्टिकर्स, नाहाटा बॉईज, सागर
पार्क बॉईज, उस्मान युनायटेड, पारोळा
फुटबॉल क्लब, गोदावरी इंजिनिअरिंग जळगाव, शिव कॉलनी फुटबॉल क्लब आदी संघाचा सहभाग असणार आहे. तसेच पंकज तिवारी,
विजय निकम, आफताब आलम, आझम
पटेल, शेख दानिश, निखील पाटील, सादिक अली हे फुटबॉल स्पर्धेचे परीक्षण करणार आहे.
Comments
Post a Comment