जी. एच. रायसोनी महाविद्यालयात अर्थसंकल्प – २०२४ वर चर्चासत्र

जळगाव, ता. ३ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ता. ३ शनिवार रोजी लर्निग अँड डेव्हलपमेंट विभागामार्फत केंद्रीय अर्थसंकल्प - २०२४ वर प्राध्यापकासमवेत चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. यात प्रमुख वक्ते व मार्गदर्शक सीए. वेणुगोपाल झवर यांनी अर्थसंकल्पावरील तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून जवळपास सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे दिसत असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे सर्व घटकांचा समावेश करत, महाविद्यालयीन विध्यार्थ्यामध्ये दर्जात्मक सुधारणा करण्याचा प्रयन्त हा अर्थसंकल्प नक्की करेल तसेच सीए झवर यांच्या अर्थसंकल्पीय अभ्यासाचे कौतुक करत त्यांनी अशी चर्चासत्रे प्राध्यापकांसाठी आयोजित करणे अत्यंत गरजेचे असून यामुळे प्राध्यापकांमध्ये राष्ट्रीय आर्थिक धोरणांची समज वाढते व आपसूकच विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यास ते सक्षम होतात असे मत संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी नमूद केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते सीए. वेणुगोपाल झवर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण करतांना तरुणाईने अर्थसंकल्प कसा समजावा, केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार ?,  संरक्षण खर्च वाढणार कि कमी होणार ? तसेच सामाजिक न्याय, ‘गरीब कल्याण, देशाचे कल्याण’, नारी शक्तीवर भर, पीएम आवास योजना (ग्रामीण), छतावर सौर उर्जा प्रणाली आणि मोफत वीज, आयुष्मान भारत, कृषी आणि अन्न प्रक्रिया, आर्थिक प्रगती, रोजगार आणि विकासाला चालना देण्यासाठी संशोधन, ‘विकसित भारता’साठी राज्यात घडवण्यात आलेल्या सुधारणा, करदात्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मिळालेली सफलता, अर्थव्यवस्था – तेव्हाची आणि आताची अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन करत अर्थसंकल्प २०२४ चे सविस्तर विश्लेषण करत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राध्यापकांनी अर्थसंकल्पावरील विविध तरतुदींबाबत प्रश्न विचारले, त्याचे निरसन अगदी सोप्या शब्दात तज्ज्ञांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्रसिंह जमादार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वाती पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व लर्निग अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी सहकार्य केले तर यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश