“जी. एच. रायसोनी करंडक” या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बिगुल वाजला
व्हिडिओच्या माध्यमातून प्राथमिक फेरीत निवड, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रंगणार नागपुरात अंतिम फेरी ; १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक
जळगाव, ता. ८ : संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष
वेधून घेणारी “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दरवर्षी नव-नव्या संहिता, दिमाखदार सादरीकरण
घेऊन येते. जानेवारी-फेब्रुवारी महिना म्हटला की कॉलेजविश्वात “जी. एच.
रायसोनी करंडक”चे वारे वाहू लागतात. या अनुषंगाने तरुण रंगकर्मींची शान
असलेल्या “जी. एच. रायसोनी करंडक” चे बिगुल वाजले आहे. गेली अनेक वर्षं
कॉलेज लाइफचा अविभाज्य घटक असणारी जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आयोजित
जी.एच. रायसोनी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा अर्थात ‘जी. एच.
रायसोनी करंडक’ येत्या १२ जानेवारीपासून अख्या महाराष्ट्रात रंगणार आहे.
प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरीत हि स्पर्धा होणार
असून स्थानिक विध्यार्थ्याच्या सोयीसाठी प्राथमिक फेरी हि ऑनलाईन पद्धतीने होणार
आहे म्हणजेच स्पर्धक महाविद्यालयांना आपल्या एकांकिकेचा व्हिडीओ चित्रित करून ghraisoni.karandak@raisoni.net या लिंकवर पाठवायचा आहे. व्हिडिओ
पाठवण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०२४ असून व्हिडीओमध्ये सहभागी असलेलेच
कलावंत अंतिम फेरीतही असणे अनिवार्य आहे. स्पर्धकांना लेखकाची परवानगी तसेच
रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून एका प्रयोगाची परवानगी किंवा डीआरएम क्रमांक
अनिवार्य आहे. अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ठ निर्मितीसाठी १ लाख ११ हजार, द्वितीय ७१,००० तर तृतीय
५१,००० रुपये रोख पुरस्कार दिले जाणार आहेत तर याशिवाय
सर्वोत्कृष्ठ निर्मितीसाठी दोन उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच सर्वोत्कृष्ठ लेखन, अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य आणि
पार्श्वसंगीत असेही वैयक्तिक पुरस्कार यावेळी दिले जाणार आहेत. प्राथमिक फेरीत
प्रवेशासाठी इच्छुक महाविद्यालयांना ५०० रुपये प्रवेश शुल्क भरायचे असून ते क्यूआर
कोड किंवा बँकेत ट्रान्सफर अशा पद्धतीने भरता येईल. स्पर्धेचा प्रवेशअर्ज आणि
नियमावली www.ghraisonikarandak.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून स्पर्धकांनी
आपला व्हिडीओ ghraisoni.karandak@raisoni.net या संकेतस्थळावर १२ जानेवारीपर्यत
पाठवायचा आहे. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील असंख्य
महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी
करंडकच्या मुख्य समन्वयिका मृणाल नाईक व टीम यांच्यावतीने करण्यात आले आहे तर स्पर्धेसंदर्भात
अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांच्या ९१७५७५८६३० यांच्याशी
किंवा ७३९१०९८१३७ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
Comments
Post a Comment