जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयाला “एनबीए” मानांकन

संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला ; महाविध्यालयावर सर्वस्तरातून कौतुकांचा वर्षाव

जळगाव, ता. ५ : येथील स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या एमबीएविभागाला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) या राष्ट्रीय संस्थेकडून २०२३-२४ ते २०२५-२६ या पुढील तीन शैक्षणिक वर्षांसाठी एनबीएमानांकन मिळाल्याची माहिती जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.

यामुळे जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे खानदेशातील ऑटोनॉमस दर्जा असलेले एनबीए मानांकन प्राप्त एकमेव महाविद्यालय ठरले आहे. सुसज्ज इमारत, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उत्तम शैक्षणिक दर्जा, कॅम्पस प्लेसमेंट, दर्जेदार निकालाची परंपरा, औदयोगिक आस्थापनांशी समन्वय अशी अनेक वैशिष्ट्ये असलेले हे महाविद्यालय खानदेश परिसरात नवीन नियमानुसार एनबीए नामांकन मिळालेले पहिलेच महाविद्यालय ठरले असून महाविध्यालयावर सर्वस्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

विविध अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणे व त्यांची निर्धारित निकषांनुसार मुल्यांकन करणे या उद्देशाने एनबीए कार्यरत असून, त्यानुसार मंडळावरील शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती, डायरेक्टर्स, विद्यापिठांचे अधिकारी, राज्य व केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यामार्फत अर्ज केलेल्या महाविद्यालयांमध्ये विभागवार तपासणी करण्यात येते. या वेळी एआयसीटीईचे नियम व मानके यांची योग्यप्रकारे अंमलबजावणीची सत्यता पडताळून पाहण्यात येते व मानांकन दिले जाते. महाविद्यालयामध्ये एनबीएच्या तज्ञ समितीने दिलेल्या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे व्हिजन, मिशन, एमबीए विभागाची शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रम, महाविद्यालयामधील अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, आउटकम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सहशैक्षणिक कामगिरी, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, योगदान, ग्रंथालय, प्रयोगशाळा, ऑफिस, जिमखाना, कॅन्टिन, विद्यार्थ्यांनी केलेले प्रोजेक्ट, त्याच्या प्रतिक्रिया, परिणामात्मक शिक्षण याचे मूल्यमापन त्याचबरोबर विविध कार्यशाळा अशा अनेक प्रकारच्या निकषांतर्गत प्रत्यक्ष तपासणी करण्यात येवून अखेर जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयास नवीन नियमानुसार नुकतेच एनबीएचे नामांकन प्राप्त झाले. या कामगिरीसाठी अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. डॉ. कौस्तव मुखर्जी, प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. मकरंद वाठ, प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया, प्रा. तन्मय भाले, प्रा. डॉ. दिपक शर्मा, प्रा. डॉ. मोनाली शर्मा, प्रा. श्रेया कोगटा, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. डॉली मंधान, प्रा. डॉ. ज्योती जाखेटे, प्रा. प्रतीक्षा जैन या एमबीए विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.   

बियोंड व्हिजनहे ब्रीद वाक्य हाती घेवून रायसोनी इस्टीट्यूटने २००७ मध्ये जळगाव शहरात सर्वोत्तम पायाभूत सुविधांनी स्थापन केलेल्या जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाने आतापर्यतच्या आपल्या कार्यकाळात अनेक विकासपर्व गाठले आणि इस्टीट्यूटची यशस्वी घौडदौड कायम राखत झपाट्याने प्रगती केली. काळाच्या ओघात अनेक बदल स्वीकारत ही इस्टीट्यूट आजपावेतो अबाधित व कालांतराने चालणारी एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ म्हणून नावारूपास आली आहे तसेच तीन वर्षांआधी स्वायत्तता दर्जा व आता एनबीएचे नामांकन प्राप्त झाल्याने रायसोनी इस्टीट्यूटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट शिक्षण क्षेत्रात संपूर्ण जगात कार्यरत असून रायसोनी महाविद्यालयाने अतिशय मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात आगेकूच केली. जळगाव शहरातील सर्व अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये अग्रस्थान मिळवून संस्थेचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाला १६ वर्ष पूर्ण होत असून शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणि काळानुसार झालेले बदल स्विकारून विद्यार्थ्यांचे हित जोपासत संस्थेची वाटचाल सुरु आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नेहमी सक्रियतेने सकारात्मक निर्णय घेतले जातात. वेळोवेळी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे सर्वेसर्वा अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने हे यश अधोरेखित झाले आहे.

 

विध्यार्थ्यांना कसा होणार “एनबीए” मानांकानाचा फायदा

एनबीए मानांकन झालेल्या महाविद्यालयांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ तसेच विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी थेट प्रवेशाची संधी मिळते. महाविद्यालयात शैक्षणिक वातावरण आणि अध्यापन आणि संशोधनाची गुणवत्ता मोठ्याप्रमाणात वाढते व विविध शैक्षणिक उपक्रम राबवत विध्यार्थी विकासाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यास यामुळे प्रोत्साहन मिळते तसेच अनेक सकारात्मक शैक्षणिक बदल या “एनबीए”मुळे होतात. 

 

प्रतिक्रिया

प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,

संचालिका, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट

जळगाव

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करण्याचे काम जी. एच. रायसोनी महाविध्यालय करीत असून नॅशनल बोर्ड ऑफ एक्रीडीशनकडून झालेल्या मूल्यांकनामुळे या कामावर मान्यतेची मोहोर उमटली आहे, विद्यार्थी, प्राध्यापक, पालक व संस्थेचे विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळणे शक्य झाले. तसेच आमचे मार्गदर्शक व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच एनबीएया एक्सलन्स पातळीला गाठू शकले. येत्या काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या इस्टीट्यूट कडून अपेक्षा आहेत त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू. दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडणार नाही तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील राहणार असून क्रेडीट सीस्टीम्स च्या माध्यामातून विध्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व उद्योगाचे धडे देणाऱ्या कोर्सेससाठी रायसोनी महाविध्यालयाने आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केल्याने जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण आम्ही देत आहोत.  

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश