जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “पेरेंट्स स्पोर्ट्स डे” सेलिब्रेशन
जळगाव, ता. २ : विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादासाठी पालकांनी शाळेला भेट देणे गरजेचे असते. आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आलेख, शाळेची प्रगती, समस्या व त्यावर उपाय या सर्व गोष्टी या साऱ्यांच्या परस्पर सहकार्यातून होऊ शकतात हे लक्षात घेऊन शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे दरवर्षी “पालक क्रीडा दिन” हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला जात आहे.
दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील स्कूलमध्ये “पालक क्रीडा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अँकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा, व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वर्गवासी जी. एच. रायसोनी व सदाबाई रायसोनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच क्रीडामशाल पेटवून व श्रीफळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पालकांसाठी कपल रेस, ठग ऑफ वॉर, डॉज बॉल, क्रिकेट ,लेमन रेस इत्यादी खेळ ठेवण्यात आले होते. पालकांनी या सर्व खेळात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत बचपन आफ्टर पचपन अनुभवले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तस्नीम रंगरेज यांनी केले तर आभार अल्फिया लेहरी यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.हे ठरले “विनिंग पेरेंट्स”
क्रिक्रेट :- विजयी संघातील खेळाडू - सीमा
मुनोत, मयुरी सोनी, तृप्ती कोगटा, अतुल कोगटा, प्रतीक मणियार, महेश सोनी, अनुप झवर,
अजिज मास्टर, राजकुमार मुनोत
वैयेक्तिक पारितोषिके :- बेस्ट फीमेल
बॉलर - शितल जैन, बेस्ट मेल बॉलर - राजकुमार मुनोत, बेस्ट फीमेल बॅटर - तृप्ती कोगटा,
बेस्ट मेल बॅटर - महेश सोनी, मॅन ऑफ द मॅच - अतुल कोगटा
ठग ऑफ वॉर :- विजयी संघातील पुरुष
खेळाडू - आशिष सोनी, मयूर अग्रवाल, रोहन मार्थी, कैलास भावसार, अजिज मास्टर,
सुनीता तलरेजा, अनुप झवर व मेहुल त्रिवेदी
ठग ऑफ वॉर :- विजयी संघातील महिला
खेळाडू - सुनिता जैन, अंकिता मार्थी, निकिता अग्रवाल, स्वाती सोनी, अलंक्रीता
लुणावत, मोनिका भावसार, सिया नागदेव
कपल रेस - प्रितेश जैन अँन्ड सुनीता
जैन, मयुरी सोनी अँन्ड महेश सोनी, राम नागदेव अँन्ड सिया नागदेव
लेमन रेस – (प्रथम) अंकिता मारुती,
(द्वितीय) अंकिता साठे (तृतीय) सीमा मुनोत, (चतुर्थ) सिया नागदेव (पाचवे) तृप्ती
गुप्ते
डबिंग द बॉल - (प्रथम) मयूर अग्रवाल, (द्वितीय)
स्वप्नील भल्ला, (तृतीय) मेहुल त्रिवेदी
Comments
Post a Comment