जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नववर्षानिमित्त “एक्सप्लोर हैप्पीनेस” कार्यशाळा
नववर्ष स्वागत कार्यक्रमाला विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विध्यार्थ्यांना दिला नवीन वर्षात निरोगी राहण्याचा “संकल्प”
जळगाव, ता. १ : या नवीन वर्षात पदार्पण करताना अनेक जण स्वत:साठी संकल्प करतात. काही नवे प्लॅन्स आखतात, याच अनुषंगाने येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात ऑल इंडिया कॉन्सिल टेक्निकल एज्युकेशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालयातील सभागृहात “एक्सप्लोर हैप्पीनेस” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. शुभम घोष व साइकोलॉजिस्ट पूनम गेडाम उपस्थित होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या म्हटल्या कि, येणाऱ्या वर्षात समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. फिट आणि तंदूरूस्त राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासोबत संतुलित आहार देखील महत्वाचा आहे. जवळपास जाताना गाडीचा वापर करण्याऐवजी तुम्ही चालत जा. लिफ्टच्या ऐवजी तुम्ही पायऱ्यांचा वापर करू शकता तसेच अभ्यास करताना पुरेपूर झोप, संतुलित आहार याकडे ही लक्ष देणे गरजेचे असून मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये ही वेळोवेळी सहभाग घेत चला तुम्हाला निश्चित यश मिळेल, तसेच यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच असा यशाचा कानमंत्रच प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला, यानंतर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम यांनी या नवीन वर्षात अभ्यासाचा अतिरिक्त ताण घेणे टाळा. त्याऐवजी, तुम्ही हा ताण नियंत्रित करायला शिका. हा ताण नियंत्रित केल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य ठीक राहिल तसेच नवीन वर्षात तुम्ही मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संकल्प करा असा सल्ला त्यांनी यावेळी विध्यार्थ्यांना दिला तसेच प्रा. शुभम घोष यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा घेत विविध प्रकारचे बौद्धिक खेळ आयोजित करून त्यांना उत्साहित केले. विद्यार्थ्यांचा नवीन वर्षात महाविद्यालयात पहिलाच दिवस असल्याने त्यांची सुरुवात आनंदीमय व्हावी. त्यासाठी गमतीशीर पद्धतीचे खेळ यावेळी घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व प्रध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment