जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे “सीबीएसई”तर्फे शिक्षक कार्यशाळा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 'सीबीएसई'ने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या माध्यमातून उपक्रम घेतला हाती

जळगाव,ता. ५ : नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या घटकांकडे बघितल्यास भविष्यातील बदल ठळकपणे अधोरेखित होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्री शिक्षण पद्धती अमलात येणार असून सर्जनशीलतेला अधिक चालना मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करून नवीन शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात आले आहे. भविष्यातील सर्वच क्षेत्रांसाठी हे शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना व शिक्षण क्षेत्रासाठी नक्की दिशादर्शक ठरेल, असा संवाद शिक्षण अभ्यासक प्रा. डॉ. स्वरूप दत्त तसेच मुख्याध्यापक आशिष अजमेरा यांनी साधला.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - शिक्षकांची भूमिका व आव्हानेया विषयावर सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे सीबीएसई माध्यमातील शाळांचे शिक्षक यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नवीन शैक्षणिक धोरणया विषयावर मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींना माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन कार्यक्रमात मलकापूर येथील एम.एस.एम. इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. स्वरूप दत्त तसेच वर्धमान यूनिवर्स एकेडमी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आशिष अजमेरा यांनी आपले मत व्यक्त केले. की, देशाला जागतिक ज्ञान महासत्ताबनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. प्रत्येक मुलाला वयाच्या चौथ्या वर्षापासून मूल्याबरोबरच कौशल्याधारित व संशोधनाचे धडे दिले जातील. प्रत्येक विद्यार्थ्याचा कल पाहून त्या विषयातील कौशल्य व संशोधन आधारित शिक्षण मिळेल. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबरच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रगतीचा देखील विचार नव्या धोरणात करण्यात आला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज देशातील प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात व्यापक संख्येचा विचार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आता ५+३+३+४ या सूत्रानुसार ३ ते ८ वर्षे, ८ ते ११ वर्षे, ११ ते १४ वर्षे आणि १४ ते १८ वर्षे असे चार टप्पे तयार करण्यात येणार आहेत. एका वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी याचे प्रमाणदेखील नव्या धोरणात निश्चित करण्यात आले आहे. तसेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुख्यत्वे एक्सेस,  इक्वलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी, अकाउंटॅबिलिटी या पाच स्तंभांवर आधारित आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी इनोवेटिव टीचिंग मेथोडोलॉजी वर मार्गदर्शन केले व विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करत आजच्या विध्यार्थ्यांना कशा प्रकारे उत्तम शिक्षण देता येईल यासंदर्भात देखील आपले मत मांडले तसेच त्यांनी यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील इनोव्हेशन लॅबमधील तंत्र व केसस्टडीबाबत संवाद साधत उपस्थित मुख्याध्यापक व इतर प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनीही आपली मते मांडली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणातील विविध बदलांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यानंतर रायसोनी पब्लिक स्कूलचे समन्वयक प्रशांत महाशब्दे यांनी आपल्या आभार प्रदर्शनात स्कूलच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणविषयक व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन लीना त्रिपाठी यांनी केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व कार्यकारी संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश