जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आयुष मंत्रालयाच्या वतीने “आयु संवाद” अभियान
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विविध प्राध्यापक-डॉक्टरांचे मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती
जळगाव, ता. १ : आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याद्वारे आयुर्वेद जनजागृती अभियानाअंतर्गत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय जळगाव याद्वारे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात गर्भिणी परिचर्या, स्त्रियांचे आजार, स्थूलता, मधुमेह प्रतिबंध, गुदगत विकार प्रतिबंध, दिनचर्या व ऋतूचर्या या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यचिकित्सा विभागप्रमुख प्रा. डॉ. शर्मीली सुर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश जाधव, स्त्रीरोगतज्ञ प्रा. डॉ. सोनाली फराटे, शल्यचिकित्सक प्रा. डॉ. सना शेख, प्रा. डॉ प्रशांत सरडे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले कि, 'आयुर्वेद' ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून देशात अस्तित्वात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरले आहेत, त्यामुळे प्रत्येकजण आयुर्वेदाचे महत्त्व समजायला लागला आहे. त्याची जनजागृती करण्यास पुढाकार घेत आहे. याचा खरच आनंद होत आहे. 'आयुष मंत्रालया'च्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरु असून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय जळगाव याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी गर्भिणी परिचर्या, स्त्रियांचे आजार, स्थूलता, मधुमेह प्रतिबंध, गुदगत विकार प्रतिबंध, दिनचर्या व ऋतूचर्या या विविध विषयांवर आयुर्वेदाच्या व्हिजननुसार सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या जनजागृती अभियानाला जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढद्कर यांनी समन्वय साधले तर सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment