जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे अभिनयाची 'मॅजिक ॲाफ ॲक्टींग' कार्यशाळा संपन्न

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या माजी विद्यार्थ्यांनी केले मार्गदर्शन ; पंधरा दिवसीय कार्यशाळेतील समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सादर

जळगाव, ता. ६ सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये पंधरा दिवसीय नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यात स्कूलमधील पहिली ते नववीच्या विध्यार्थी प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा देवभूमी नाटक अकादमीचे माजी विध्यार्थी अरीबान बनिक, स्नेहा कुमार, विजय राजवंशी व आहोबाम हेमलता देवी यांच्या मार्गदर्शनात हि कार्यशाळा घेण्यात आली. यात थिएटर, योगा, एरोबिक्स, देहबोली, संवाद कौशल्य, लेखन, दिग्दर्शन, पात्ररचना, प्रसंगनाट्य, रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, निर्मिती प्रक्रिया या प्रमुख नाट्य नाट्यशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या नाट्यकार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह  स्कूल कमिटी सदस्य यांचे सहकार्य लाभले. तर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश