महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या जिल्ह्यातून सर्वाधिक ४८ आयडियांची निवड

युवकांच्या नवीन कल्पनांना उभारी देणारी स्पर्धा संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे कौतुक

जळगावता. २ :  राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता इनोव्हेशन विभागांतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे. यात जिल्हास्तरीय निवड झालेल्या नवउद्योजकांना प्रत्येकी एक लाखतर राजस्तरीय निवड झालेल्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बीजभांडवल देण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थीनवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणेतसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहनतज्ज्ञ मार्गदर्शननिधी व आवश्यक पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या अनुषगाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विध्यार्थ्याच्या ४८ आयडियांची निवड झाली असून ते पुढील फेरी साठी पात्र झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील एकाच संस्थेतून निवडलेल्या आयडियांची ही सर्वाधिक संख्या आहे. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धेचे समन्वय रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता व डीन इंडस्ट्री प्रा. ज्योती जाखेटे यांनी साधले. तसेच सदर प्राथमिक फेरीचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश