आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा संघ “विजेता”

संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विजेत्यांचे कौतुक ; पंकज पाटील व महेश वाघ या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव, ता. १ :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग समिती व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव शहर आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास ०२-०४ ने नमवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग समितीतर्फे दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर चालू होते. या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. यात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने प्रथम सामना हा पी. जी. यु. जी विद्यापीठाला ०३-०० व आय. एम. आर महाविद्यालयाला ०१- ०४ या गोलने नमवले तर उपांत्य फेरी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या संघासोबत खेळला गेला त्या सामन्यात महेश वाघ व पंकज पाटील यां विध्यार्थ्यानी उत्कृष्ट कामगिरीने ० - ०३ ने सामना जिंकत अंतिम सामना गाठला तसेच आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाला मात देत पेनल्टी शूट मध्ये पोहोचून ०२-०४ गोलने विजयश्री संपादन केले. सदर स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव व क्रीडा शिक्षक राहुल धुळणकर यांचे संघातील सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश