तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचा संघ विजयी

जळगाव, ता.१४ : जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या १९ वर्ष गटात अंतिम सामन्यात जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संघाने असोदा येथील सार्वजनिक कनिष्ट महाविद्यालयाच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भरपावसात झालेल्या या सामन्यात जी. एच. रायसोनीच्या खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करीत विजयर्शी प्राप्त केली. संघातील अलाईजा जॉन व पुरषोत्तम यादव या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे सुवर्ण आणि रौप्यपदके देण्यात आली. पदक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू फारुख शेख,प्रशांत कोल्हे, वसीम खान उपस्थित होते. या स्पर्धेत विजयी झालेले संघ जिल्हास्तरीय पातळीसाठी पात्र ठरले असून हि स्पर्धा १६  ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी अभिनंदन केले तर क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव व क्रीडा शिक्षक राहुल धुळणकर यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.


Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश