जी. एच. रायसोनी महाविद्यालयात जल्लोषात रंगली तरुणाईची दहीहंडी

जळगाव, ता. ९ –   रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील विध्यार्थी विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडीविविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोषअशा उत्साही वातावरणात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहीहंडीचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी दहीहंडी फोडणे, नृत्य, गायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी केली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व  रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विध्यार्थ्याशी संवाद साधताना रायसोनी इन्स्टिट्यूटच्या  संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी, सर्व विध्यार्थ्यानी समाजात सामाजिक सलोखा जपून त्याद्वारे बंधुता व एकता जोपासणे महत्वाचे आहे. तसेच युवकांमधील साहस वाढविणे, एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहीहंडीचा उपक्रम राबविण्यात आला असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात श्रीकृष्ण व  राधेच्या वेशभूषेत अनेक विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पाटील, गौतम पांडे या विध्यार्थ्यानी केले तर कार्यक्रमाचे समन्वय प्रा.वसिम पटेल व प्रा. पूजा नवल यांनी साधले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश