महिला 'अर्थ साक्षर' होणे काळाची गरज : मनीषा चौधरी
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील “पिंक हॅट्स क्लब”चा उपक्रम ; “फायनान्शियल लिटरसी फॉर वूमन” या विषयावर कार्यशाळा
जळगाव, ता.
४ : महिला सबंधीच्या अनेक विषयावर चर्चा होताना आपण पाहतो मात्र त्यांच्या अर्थ
साक्षरतेबाबत अभावानेच चर्चा होताना दिसते. महिला ही गृहिणी किंवा अर्थाजन करणारी
असो, तसेच ग्रामीण किंवा शहरी असो ती अर्थ साक्षर असणे अत्यंत गरजेचे आहे.
महिला अर्थ साक्षरतेचे प्रमाण मुळातच कमी असून त्यातीलही केवळ ३० ते ३५% महिला
आत्मविश्वासाने आर्थिक व्यवहार करताना दिसतात. परिणामत: आजकाल महिला जरी मोठ्या
प्रमाणावर अर्थार्जन करीत असल्या तरी बहुतांश आर्थिक व्यवहार आजही घरातील पुरुष
पहात असतात. त्या दृष्टीने आर्थिक साक्षरता म्हणजे नेमके काय हे समजणे आवश्यक आहे
असे मत सर्टिफाईड फायनान्सियल प्लॅनर व चॉक-टॉकच्या फाउंडर मनीषा चौधरी यांनी जी.
एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील
इंजिनीअरिंग व मॅनेजमेंट शाखेतील विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सदर
कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल यांनी राजकारण, सामाजिक, शैक्षणिक,
वैद्यकीय
आदी क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उभारत आहेत. संसार सांभाळून,
नोकरी-व्यवसायात
उंच भरारी घेणाऱ्या अनेकजणी तारेवरची कसरत करत यशस्वी होत आहेत. अनेक अडीअडचणींवर
मात करीत ‘ति’चा अखंडित प्रवास सुरू आहे. या अनुषंगाने
भविष्यातील उद्योगात महिला नक्कीच गेम चेंजर ठरतील तसेच आज महिलांना करण्यासारख्या
अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. भारतातील आर्थिक, तसेच सामाजिक व
सांस्कृतिक वातावरण बदलू लागले आहे. उद्योग क्षेत्रात भरारी घेण्याचे धाडस आणि
इच्छाशक्ती असलेल्या तरुण महिलांसाठी ते पोषक आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त
केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना मनीषा चौधरी यांनी नमूद केले
कि, सर्वसाधारणपणे मुले आईचे पटकन ऐकतात व आईही मुलांना जास्त समजून घेत
असते जर आई अर्थ साक्षर असेल तर मुलांना आपल्या कुटुंबच्या आर्थिक परिस्थितीची
योग्य समज देऊन त्यानाही आर्थिक शिस्त लावू शकते. बहुतेक सर्व कुटुंबात दैनदिन
गरजांची नेमकी माहिती महिलांना जास्त असते अर्थ साक्षर महिला आपल्या कुटुंबाची
आर्थिक घडी जास्त चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. अर्थ साक्षर महिला आपले दैनदिन
व्यवहार आत्मविश्वासाने करू शकते. तसेच अर्थ साक्षर महिला आपल्या भविष्यातील
गरजांसाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करू शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सोनल पाटील यांनी तर आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय “पिंक हॅट्स क्लब”च्या सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सोनल पाटील यांनी तर आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय “पिंक हॅट्स क्लब”च्या सहकारी प्राध्यापकांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले
Comments
Post a Comment