जी. एच. रायसोनी महाविद्यालयात नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव, ता. १६  : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी बीबीए, बीसीए, एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी नुकतेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स वेलकम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी व महाविद्यालयाची ओळख व्हावी व खेळीमेळीच्या वातावरणात शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करावा यासाठी या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता हे उपस्थीत होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमात सहभाग घेऊन आपापल्या कलेचे प्रदर्शन केले. नवीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बौद्धिक व स्पर्धात्मक टास्क देऊन महाविद्यालयातील प्रत्येक कोर्ससाठी मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर यांची निवड करण्यात आली. एमसीए प्रथम वर्ष या वर्गातून मोहित गुजर हा मिस्टर फ्रेशर्स व मिस फ्रेशर म्हणून निकिता जावळे,  एमबीए प्रथम वर्ष वर्गातून मिस फ्रेशर दर्शना पवार व रोहित बाविस्कर मिस्टर फ्रेशर्स. बीसीएच्या वर्गातून लोकेश तलरेजा व साक्षी विसरानी तसेच बीबीए या विभागातून सेजल बाहेती व करण जाधवांनी यांची मिस्टर व मिस फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली. तसेच सर्वोत्तम पोशाक रोहित चौधरी-दिव्या भारुळे, बेस्ट स्माईल नुपूर जोशी- प्रियांशु शर्मा, बेस्ट पर्सनालिटी रिचड पिंडू, कीर्तन मंधान तसेच बेस्ट वॉक मध्ये अक्षय कुमार व दर्शन पाटील यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत प्रा. ज्योती जाखेटे, प्रा. प्रिया टेकवानी व शुभम घोष हे उपस्थित होते. प्राध्यापक कॉर्डिनेटर म्हणून एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी,  बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, बीबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील, प्रा. तन्मय भाले, प्रा.रोहित साळुंखे, प्रा. श्रिया कोगटा, प्रा.रुपाली ढाके, प्रा.विनोद महाजन, प्रा.करिष्मा चौधरी, प्रा.हर्षिता तलरेजा, प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा.मनीषा राजपूत, प्रा.कविता भंगाळे, प्रा.वर्षा सुरळकर, प्रा.मानसी तळेले, प्रा.सरोज पाटील, प्रा. गणेश पाटील व भांडारपाल अजय चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमात प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थिती दर्शवली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश