जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे 'इन्वेस्टेचर सेरेमनी' चे मोठ्या दिमाखात आयोजन

हेड बॉय सिद्धांत काबरा तर हेड गर्ल म्हणून टिया देसाई यांची निवड ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांची प्रमुख उपस्थिती

जळगाव, ता. २३ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे “इन्वेस्टेचर सेरेमनी” हा शालेय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच आगामी नेतृत्व, ठराविक भूमिका व जबाबदाऱ्या सोपवून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययनाचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी इन्वेस्टीचर सेरीमनी नितांत गरजेची असते. शालेय जीवनात मिळालेल्या या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रबलता येते व आगामी जीवनात संघ व्यवस्थापन कौशल्य व स्वयंशिस्त यांसारख्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे पार पाडू शकतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिलिंद थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पदांचा कार्यभार सोपवत त्यांना बॅचेस व शाश रिबीन प्रधान करण्यात आले. यावेळी विविध विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रेरणादायी अशी गीते गायली व नृत्य देखील सादर केले. या कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मिलिंद थोरात यांनी स्वतः बद्दलचे शालेय अनुभव विद्यार्थ्यांना सांगत आपल्या जीवनातील वेळेचे व त्याच बरोबर खेळाचे महत्व देखील सांगितले. यावेळी त्यांनी प्रस्तुत कार्यक्रमाच्या व्यवस्थितरित्या केलेले आयोजन, विद्यार्थ्यांची शिस्त या सर्वांची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना त्यांच्या पदाची जबाबदारी देत सर्वाना विधीच्या माध्यमातून शपथ दिली तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या कि, “ए विजन बियोंडहे जी. एच. रायसोनी ग्रुपचे ब्रीदवाक्य असून त्याला वास्तवात रुपांतर करणारा हा एक विशेष सोहळा आहे. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा इन्वेस्टेचर सेरेमनी म्हणजे केवळ पदव्या प्रदान करणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना जबाबदारी सोपवणे, विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व नेतृत्व या सदगुणांना निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या निर्णय कौशल्य, संवाद आणि टीमवर्क यांच्या सहाय्याने त्यांना हवे त्या उंचीवर नेणे असा आहे तसेच या इन्वेस्टेचर सेरेमनीचे सदस्य शाळेसाठी निष्ठेने काम करण्याची शपथ घेतात व आमच्या संचालिका श्रीमती राजुल रायसोनी, त्यांना प्रत्येक प्रयत्नासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास आणि इतरांसाठी प्रेरणा बनण्यास प्रोत्साहित करतात. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व तालबद्ध रीतीने संचलन करून उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. या नयनरम्य संचलनाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र ठरले. तसेच शालेय शिक्षणाबरोबरच, व्यक्तिमत्व विकास, विविध अॅक्टीव्हीटीलाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

या विद्यार्थ्यांची निवड

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथील इन्वेस्टेचर सेरेमनीत हेड बॉय सिद्धांत काबरा तर हेड गर्ल म्हणून टिया देसाई यांची निवड करण्यात आली तसेच ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, पर्पल या चार हाउसेस मधील प्रीफेक्ट म्हणून ग्यान झवर, रोनक दहाड, पार्थ नारखेडे, नामी रांका, हार्दिक मनोचा, तस्नीम बदामी, देवेंद्र वर्मा, रितिक मराठे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यानंतर कोडींग क्लब - वेदांत जंगले, लेट्स टॉक क्लब – पार्व जैन, स्पोर्ट्स क्लब - श्लोक महाजन, कल्चरल क्लब - कनक सोनवणे, डिसिप्लिन कमिटी - राधिका सोनी या पदांवर विविध वर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश