जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या एमसीए विभागाची 'लॉजिकलिजेंड-२०२३' स्पर्धा संपन्न
२५० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी
जळगाव,ता. १ : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या 'लॉजिकलिजेंड-२०२३' चे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मोठ्या उत्साहात हा उपक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला २५० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कल्याणी नेवे यांनी समारोप कार्यक्रमात
प्रस्तावना केली. तर उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना संचालिका प्रा. डॉ.
प्रिती अग्रवाल म्हणाले की, “तुम्ही स्वतःच स्वतःचे जज्ज व्हायला हवे. यापुढे तुमच्या
इनोव्हेटिव्ह आणि न्यु आयडिया महत्त्वाच्या ठरणार आहेत. तुमची डिग्री कोणती आहे
यापेक्षा तुम्ही कीती अपडेट आहात हे जास्ती महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच 100 % एफर्ट हवेच पण त्याबरोबरीने
तुमचे स्कील कॉर्पोरेट मध्ये अतिशय महत्वाचे ठरतात. आय टि ईंडस्टी ला नेमके काय
हवे याचा नीट अभ्यास करा. तुमची डिग्री आणि मार्क जितके महत्वाचे नाही त्यापेक्षा
तुम्हाला तुमच्या विषयातले काय येते, त्याचे ईंप्लिमेंटेशन तुम्ही कसे करतात त्यात किती इनोव्हेशन आणि
न्यु आयडिया आहेत हे महत्वाचे ठरते.” सदर स्पर्धेत वेब पेज डेव्हलपमेट, पॅटर्ण क्रिएशन व ब्लाईड कोडींग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
होते. या विविध स्पर्धेच्या परिक्षक म्हणून प्रा. कल्याणी नेवे यांनी काम पाहिले. तर
बीसीए व एमसीए विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या
स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. रफिक शेख, प्रा.रुपाली ढाके, प्रा.ऐश्वर्या परदेशी, प्रा. करिश्मा चौधरी, प्रा विनोद महाजन, प्रा.मनिषा राजपूत, प्रा.मानसी दुसे, प्रा हर्षिता तलरेजा, प्रा.कविता भंगाळे यांनी सहकार्य केले.
स्पर्धेतील विजेते
वेब डेव्हलपमेंट स्पर्धा
प्रथम : निलेश प्रेमचंद भंगाळे
व्दितीय : खुशाल भगवान पाटील
पॅटर्ण क्रिएशन
प्रथम :- वसंत रुद्र रावत
द्वितीय :- एस.के. सुफियान अली
ब्लाइंड कोडिंग
प्रथम :- प्रतीक संजय सुलक्षणे
द्वितीय :- लोकेश सुभाष तलरेजा
Comments
Post a Comment