जी. एच. रायसोनी महाविद्यालयात 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह' विविध उपक्रमांनी संपन्न

तज्ञ प्रशिक्षकांचे सखोल मार्गदर्शन ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग  

जळगाव, ता. २ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात २४ जुलै ते २९ जुलै या दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पोस्टर आणि व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, उद्योग तज्ञांसोबत पॅनेल चर्चाइंटर्नशिप आणि प्रकल्पांसाठी लघु उद्योग भारतीसह सामंजस्य करार,  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचे शैक्षणिक समुदायाला मार्गदर्शनाचे महाविद्यालयात लाईव्ह प्रक्षेपण तसेच 'नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने लिंक्डइनवर नेटवर्किंगद्वारे नोकरीच्या संधी"या विषयावर सुदर्श कटारिया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नौकरी व व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन, चॅटजीपीटी एक अभिनव तंत्रज्ञान त्याचे महत्वाचे फायदे व परिणाम आणि त्यासंबंधीत विविध बाबींवर त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला, यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी देशाला जागतिक ज्ञान महासत्ताबनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबरच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रगतीचा देखील विचार नव्या धोरणात करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० ची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त रायसोनी महाविद्यालयात डबल डिग्री प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची आधीपासूनच सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु आहे. तसेच या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार आहे. थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार असल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली व विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असल्याचे सांगितले तसेच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुख्यत्वे एक्सेस,  इक्वलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी, अकाउंटॅबिलिटी या पाच स्तंभांवर आधारित आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या सप्ताहाअंतर्गत विध्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व, त्याचे लाभ, विविध पैलू समजावून सांगण्यात आले. या मध्ये एबीसी अर्थात ऍकेडेमिक बँक क्रेडिट, सब्जेक्ट बास्केट, मेजर मायनर, ४ वर्षांची डिग्री काय असेल डिग्री मध्ये सोडल्यावर प्रमाणपत्र कधी मिळेल या सर्वांबद्दल विस्तृत माहित संपूर्ण सप्ताहभर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक रायसोनी इस्टीट्युटचे रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता हे होते. हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी विदयार्थी आणि प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले. सदर सप्ताहाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश