राष्ट्रीय फिनस्विमिंग जलतरण स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी
स्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा भंडारी हिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत एक रौप्य व एक कांस्य पदकाची कमाई
जळगाव, ता. ९ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील इयत्ता नववीची विध्यार्थिनी ऋतुजा हर्षल भंडारी हिने नुकतेच उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मोठे यश संपादन केले असून 4x50 या मिक्स रिले प्रकारात रौप्य पदक तर २०० मीटर या प्रकारातही कांस्य पदक मिळवत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विजयी ठरलेल्या ऋतुजा भंडारी हिचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर जलतरण प्रशिक्षक वैभव सोनवणे व क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment