जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे “युएसए” येथील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत “विजेतेपद”

जळगाव, ता. ११ : युनायटेड स्टेट लॉन टेनिस असोसीएशनद्वारा आयोजित स्टार्स ज्यूनिअर टेनिस टूर्नामेंट नुकतीच यु. एस. ए. मधील नेपल्सच्या फ्लोरीडो येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल (जिएचआरपीएस)ने विजेतेपद प्राप्त केले आहे.

जिएचआरपीएसचा विद्यार्थी समन्यु रिषभ जैन (इयत्ता सहावी) याने लॉन टेनिसच्या १४ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत विजेतेपद पटकाविले. या अनुशंगाने विजयी ठरलेल्या समन्यु रिषभ जैन याचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश